उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; शरीरातील पाण्याची कमतरता होईल कमी…
उन्हाळ्यात अधिक उष्णतेचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अधिक उष्णतेमुळे आपल्याला उष्माघात,सन टॅन आणि डीहायड्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात. उष्माघातामुळे आपल्या सतत चक्कर किंवा थकवा वाटू शकतो. या समस्या कमी करण्यासाठी जाणून घेऊया काही घरगुती उपाय.
अधिक उष्णतेमुळे आपल्याला उष्माघात,सन टॅन आणि डीहायड्रेशन सारख्या समस्या होऊ शकतात. उष्माघातामुळे आपल्या सतत चक्कर किंवा थकवा वाटू शकतो. या समस्या कमी करण्यासाठी जाणून घेऊया काही घरगुती उपाय.
१)चिंचेमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. उकळत्या पाण्यात थोडी चिंच भिजवून त्यांना गाळून घ्या आणि चिमूटभर साखर टाकून प्यायल्याने तुमच्या शरीरामधील उष्ण तापमान कमी होते. चिंचेचा रस पोटाच्या आजारांवर उपचार करण्यास देखील मदत करते.
२)उन्हाळ्यात कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो कारण कांदा नैसर्गिकरित्या आपल्या शरीराचे उष्ण तापमान कमी करते. उन्हाळ्यात तुम्ही आहारात सॅलडसोबत कांद्याचे समावेश करू शकता.
३)उन्हाळयात बडीशेप खाल्ल्याने आपल्या शरीराचे तापमान थंड राहते. तुम्ही बडीशेप रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे तुमचे शरीर नैसर्गिकरित्या थंड राहील आणि हे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
४)लिंबू सरबत हे उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम पेय मानले जाते. व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू सरबत प्यायल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि लिंबू सरबत डिटॉक्सिफिकेशनमध्ये ही मदत करते.
५)नारळाचे पाणी तुमच्या शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे भरून काढण्यास मदत करते जे उन्हाळ्यात जास्त घामामुळे कमी होतात. उन्हाळ्यात नारळाचे पाणी तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे नैसर्गिकरित्या संतुलन करून तुमचे शरीर रिहायड्रेट करते.
६)अधिक उष्णतेमुळे जेव्हा मळमळ होत असेल तेव्हा तुम्ही धणे आणि पुदिन्याचा रस पिऊ शकता. धणे आणि पुदिना हे पदार्थ थंडावा शरीराला थंडावा देतात, त्यामुळे उन्हाळ्यात या दोन पदार्थांचे सरबत करून प्यायल्याने शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो.
Post a Comment