लोकसभा निवडणूक 2024 केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी 1,2,3,प्रशिक्षण

लोकसभा निवडणूक 2024 केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी प्रशिक्षण
निवडणुकीतील महत्वाचे बदल अनुपस्थित मतदार AVSC, AVPD, AVES, AVCO साठी टपाली मतदान. निवडणूक कर्तव्यावर अधिकारी/कर्मचारी टपाली मतदान साठी "सुविधा केंद्र" (Facilitation Center) क्षेत्रिय अधिकारी साठी अहवाल 1) अहवाल VM-2 2) अहवाल VM-3. फोटो व्होटर स्लिप (Photo Voter Slip) ऐवजी व्होटर सुचना स्लिप (Voter Information Slip) अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपीतील AVIS (Accessible Voter Information Slip). चिन्हांकित मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या असतील. मतदार यादीच्या एका प्रतिवर् ब्रच्या बाजूवर निवडणूक निर्णय अधिकारी/सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सही केलेले जोडपत्र 4 मधिल प्रमाणपत्र. गुलाबी कागदी मोहोर तसेच हिरवी कागदी मोहोर मध्ये बदल (मतदान यंत्र मोहोरबंद करण्यासाठी पट्टी सील ABCD आवश्यकता नाही.) अभिरूप मतदान वेळी VVPAT मधुन निघालेल्या 7 चाचणी चिठ्ठया देखिल मॉकपोलच्या 50 चिठ्ठया सोबत काळ्या लिफाफ्यात सीलबंद करणे आवश्यक. प्रत्यक्ष मतदान दरम्यान CU किंवा VVPAT बॅटरी सदोष झाल्यास बदलता येणार. मतदान साहित्य संकलन मध्ये बदल नवीन प्रकारे सहा पाकिटे कलर कोडसह संकलित होणार मतदान सुरुवात करताना मतदान अधिकारी 2 कडील मतदार नोंदवहीत (नमुना 17 अ) मध्ये केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करून "नियंत्रण युनिट तपासणी केली आहे. व एकूण शुन्य असल्याचे आढळले आहे" अशी शाईने नोंद करणे. मतदान केंद्राध्यक्ष व सुक्ष्म निरीक्षक मतदान केंद्रात ध्वनीरहित (silent mode) मोबाईल वापरण्यास परवानगी. मतदान केंद्राला भेट देणारे अभ्यागत साठी VISIT SHEET नमुना. केंद्राध्यक्ष दैनंदिनी मध्ये तपशिल देणे आवश्यक (मुद्दा 19 व) विधानसभा मतदार संघातील कोणताही मतदार त्या मतदारसंघात मतदान प्रतिनिधी म्हणुन नेमणुकीस पात्र. ग्रामपंचायत प्रधान/सरपंच/पंचायत सदस्य/परिषद सदस्य/महानगरपालिका सदस्य मतदान प्रतिनिधी राहू शकतात. सर्व अतिसंवेदनशील मतदान केंद्र (Vulnerable) व असुरक्षित मतदान केंद्र (Critical) एकूण मतदान केंद्राच्या किमान 50% यापैकी जे अधिक असेल तेथे वेबकास्टिंग करण्यात येईल. मतदान पथक यांना देण्यात येणाऱ्या साहित्यात विविध नमुने BOOKLET स्वरुपात देण्यात येतील. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी छाननीत मतदार नोंदवहीं (नमुना 17 अ) मधिल शेरा व तिसरा रकान्यातील ओळखपत्र किंवा इतर पुरावे नमूद केलेबाबत तपासणी होईल
.


https://drive.google.com/file/d/1z8aEHTO9wqAjuAC5-EFkHmr9YAtwqRAk/view?usp=drivesdk

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post