200 शब्द समुहाबद्दल एक शब्द -स्पर्धा परीक्षा
enu
४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) | मराठी व्याकरण
October 8, 2023 by marathigrammar.in
४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) | मराठी व्याकरण
Contents hide
1 ४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution) | मराठी व्याकरण
1.1 ४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द
1.2 एका शब्दाबद्दल शब्दसमूह विडिओ माध्यमातून :
1.2.1 शब्द समूहाबद्दल एक शब्द-400 शब्द pdf सह
1.2.2 शब्द समूहाबद्दल एक शब्द भाग-१ / एका शब्दाबद्दल शब्दसमूह …
1.2.3 म्हणजे काय ? ( एका शब्दाबद्दल शब्दसमूह )
1.2.4 शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
1.3 Share this:
४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
४००+ शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)
Shabd Samuh in Marathi Grammar सांगणार आहोत चला तर मग पाहूया…
अनुज – सर्वांत शेवटी जन्मलेला
अवीट – ज्याला कधीही वीट नाही असे
अप्सरा -देवलोकातील सुंदर स्त्रिया
अभाव – एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती.
अतिथी -घरी पाहुणा म्हणून आलेला
आशीर्वाद – थोरांनी लहानांच्या प्रति व्यक्त केलेली सदिच्छा
अनावर – आवरता येणार नाही असे
अष्टपैलू – विविध बाबींत प्रवीण असलेला
अविनाशी कधीही नाश न पावणारा
अथांग – ज्याचा थांग लागत नाही असा
नांदी नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत
नौकाविहार – नावेतून करावयाची क्रीडा
परोपजीवी – दुसऱ्याच्या जिवावर जगणारा
परस्परावलंबी- एकमेकांवर अवलंबून असणारे
परावलंबी – दुसऱ्यावर अवलंबून असणारा
पक्ष (पंधरवडा) – पंधरा दिवसांचा काळ
पंच – तंटा सोडविण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक
पंचांग – तिथी, वार, नक्षत्र, योग व करण वगैरे दिनवैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका
प्रलयकाळ – जगाचा नाश होण्याची वेळ
पाणपोई – फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय
पाऊलवाट – फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट
पागा – किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा
अनुपम -ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे.
अपरिहार्य – न टाळता येणारे
अवर्णनीय – वर्णन करता येणार नाही असे
अविनाशी – कधीही नाश न पावणारे
अविस्मरणीय – ज्याचा विसर पडणार नाही असा
अननुभवी – अनुभव नसलेला
अंगाईगीत – लहान मुलाला झोपवण्यासाठी गायिलेले गाणे.
अविवाहित – ज्याचा विवाह झाला नाही असा
अल्पसंतुष्ट – थोडक्यात समाधान मानणारा
अर्धचंद्र देणे – हकालपट्टी करणे
अप्पलपोटा – स्वत:च्या फायद्याचे पाहणारा
अजातशत्रू – ज्यास कोणीही शत्रू नाही असा
अल्पायू – कमी आयुष्य असलेला
अजिंक्य – ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा
अत्युच्च – अतिशय उंच असणारा
अनाथाश्रम -निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था
अन्योक्ती – एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे
अल्पसंतुष्टी – थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती
अनवाणी – पायात पादत्राणे न घालता
अभूतपूर्व -पूर्वी कधीही न घडलेले
अनमोल – ज्याची किंमत होऊ शकत नाही असे
अश्रुतपूर्व- पूर्वी कधीही न ऐकलेले
अनाथ – कोणाचाही आधार नाही असा
अपक्ष – कोणाच्याही पक्षात सामील न होणारा
अमर – ज्याला कधीही मृत्यू नाही असा
अनुयायी – नेत्याचे अनुकरण करणारे
अन्नदाता -अन्न देणारा
अनावरण – पडदा दूर करणे
अतुलनीय – तुलना करता येणार नाही असे
अनाकलनीय – न कळण्यासारखे
असीम – ज्याला सीमा नाही असा
अंकुश – हत्तीला वश करण्याचे साधन
अप्रस्तुत -विषयाला सोडून बोलणे
अजर ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा
अन्नछत्र -मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण
अबदरखाना – स्वच्छ, गार पाणी ठेवण्याची जागा
आपादमस्तक -संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत
आहेर – लग्नात द्यावयाची भेट
आदिवासी -अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी
कर्णमधुर -ऐकण्यास गोड लागणारे
कृष्णपक्ष – अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा / वद्यपक्ष
कल्पवृक्ष -इच्छिलेली वस्तू देणारे झाड
कर्तव्यपराङ्मुख – कर्तव्याकडे पाठ फिरविणारा
कथेकरी -कथा सांगणारा
कलावान – एखादी कला अंगी असणारा
कपोतवृत्ती -कबुतराप्रमाणे अन्न संचयकरून अल्प काळात त्याचा उपयोग करणे.
अष्टावधानी -अनेक बाबींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा
कळवळणे – असहायपणे विनंती करणे.
कृतज्ञ – केलेले उपकार जाणणारा
कृतघ्न – केलेले उपकार न जाणणारा
कर्तव्यतत्पर – आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा
कामधेनू – इच्छिलेली वस्तू देणारी गाय
कामचुकार – कामाची टाळाटाळ करणारा
कार्यक्षम – कार्य करण्यास सक्षम असलेला –
कुंजविहारी – कुंजात विहार करणारा
काठवत -भाकरी करण्याची लाकडी परात
क्रांती – अकस्मात घडून आलेला बदल
कुंभार -मडकी बनविणारा
खग – आकाशात गमन करणारा
खट्याळ – नेहमी खोडी काढणारा
खर्चीक – सतत पैसे खर्च करणारा
जागा
तितीक्षा – हालअपेष्टा सहन करण्याचा गुण
तोंडपुजेपणा – तोंडावर स्तुती करण्याचा गुण
ताम्रपट -तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख
तोळा मासा – अतिशय नाजूक
दंतकथा – तोडातोडी चालत आलेली गोष्ट
दीपस्तंभ -जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा
द्वीपकल्प – तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश
दिवाभीत – दिवसाला भिणारे
दैववादी – नशिबावर विश्वास ठेवून वागणारा
द्विज – दोन वेळा जन्मलेला ब्राह्मण, दात व पक्षी यांना द्विज म्हणतात.
नादिष्ट – एकाच गोष्टीचा नाद करणारा
नवमतवादी – नवीन मतांचा पुरस्कार करणारा
निष्पक्षपाती – कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा
नियतकालिक – ठरावीक काळानंतर प्रसिद्ध होणारे
निरपेक्ष- कसलीही अपेक्षा नसणारा
निर्भय – कशाचीही भीती नसणारा
निष्कलंक – चारित्र्यावर कसलाही डाग नसणारा
नट – नाटकात भूमिका करणारा पुरुष
निराधार – कुणाचाही आधार नसणारा
निराकार – ज्याला आकार नाही असा
नभचर – आकाशात वावरणारे
नंदादीप – देवापुढे सतत जळणारा दिवा
निरक्षर – लिहिता-वाचता न येणारा
नांदी नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत
नौकाविहार – नावेतून करावयाची क्रीडा
आल्हाददायक – मनाला आल्हाद देणारा
शब्द समुहाबद्दल एक शब्द -स्पर्धा परीक्षा
Suresh Sude
0
Post a Comment