आपले नाव मतदार यादीत शोधणे व Voter Registration App : नवीन मतदारांनो, ‘घरबसल्या’ नावनोंदणी करा

 Voter Registration App : नवीन मतदारांनो, ‘घरबसल्या’ नावनोंदणी करा; व्होटर हेल्पलाईनचा घ्या लाभ...




मतदार यादीत आपले यादी क्रमांक,भाग क्रमांक,व अनुक्रमांक शोधण्यासाठी क्लिक करा. https://electoralsearch.eci.gov.in/ Voter Registration App : भारतातील कोणत्याही नागरिकाने वयाची १८ वर्षे पूर्ण केली, तर त्याला मतदानाचा हक्क प्राप्त होतो. याबाबत अनेक तरुण, तरुणी, नागरिकांना माहिती नसते. भारत लोकशाही देश आहे.


त्यात केंद्र व राज्य सरकार मतदारांनी केलेल्या मतदानाद्वारे निवडले जाते. यामुळे प्रत्येकाच्या मताला अनमोल किंमत आहे. आता मतदार नोंदणी नागरिकांना घरबसल्या करता येईल,

लोकशाहीत मतदानाला अधिक महत्त्व असते. शंभर टक्के मतदारांनी मतदान केले तरच सुदृढ लोकशाही मतदानाच्या माध्यमातून अस्तित्वात येते. मात्र, मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ५५ ते ६० टक्केच मतदान झाल्याचे दिसते. सुदृढ लोकशाहीसाठी १०० टक्के मतदान होणे गरजेचे आहे.


अनेक नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता नसते. यामुळे जिल्हा प्रशासन वेळोवेळी मतदार जनजागृती करीत असते. काहींना मतदानाची इच्छा असते. मात्र, मतदारयादीत नाव नसल्याने मतदान करता येत नाही.


ऐनवेळी मतदार यादीत नाव टाकता येत नाही. यामुळे १८ वर्षे वय होताच प्रत्येकाने मतदार नोंदणी केली, तर त्याचे नाव कायमस्वरूपी मतदार यादीत असते. मतदार नोंदणीसाठी संबंधित प्रभागाच्या बूथवर संबंधित कागदपत्रे घेऊन जावे लागत होते. मात्र, आता घरबसल्या सर्वांनाच मतदार नोंदणी करण्याची सुविधा आहे.

ॲप’च्या माध्यमातून दुरुस्तीही करता येणार


नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूकविषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप उपयुक्त आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले ॲप डाउनलोड करून घ्यावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता ॲपच्या मदतीने नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे शक्य आहे.


अथवा अस्तित्वात असलेल्या मतदार यादीतील नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो. मृत मतदाराचे नाव नातेवाईक वगळू शकतात.‌ तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवरील

 https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen 

या लिंकच्या माध्यमातून हे ॲप डाउनलोड करून या सुविधेचा लाभ घेता येईल.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post