Pan Card : घरबसल्या झटपट पॅन कार्ड हवंय? मग असा करा ऑनलाइन अर्ज
How To Apply For Pan Card Online: हल्ली कोणत्याही महत्वाच्या कामासाठी तुमचं नागरिकत्व सिद्ध करत जे काही कागदपत्र गोळा करावे लागतात त्यात पॅनकार्ड फार महत्वाचा भाग असतो. अगदी शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून बँकेत अकाउंट उघडण्यापर्यंत, टॅक्स भरणे अशा अनेक कामांसाठी पॅनकार्ड फार गरजेचं असतं.
पूर्वी हे पॅनकार्ड काढण्यासठी तासन् तास रांगेत उभे राहून अर्ज भरावा लागत असे. पण आता उन्हातान्हात ताटकळत उभे राहण्याची गरज नाही. घरबसल्याच ऑनलाइन अर्ज काढता येणे सहज शक्य असते.
पॅनकार्डचं महत्व
यात पॅन नंबर आणि कार्डधारकाच्या ओळख संबंधी माहिती असते. शिवाय या पॅनकार्ड नंबरमध्ये व्यक्तीच्या टॅक्स आणि गुंतवणुकीची माहिती असते. त्यामुळे प्रत्येकाला आपला पॅन नंबर माहिती असणं फार आवश्यक असते.
पॅनकार्ड साठी कोण अर्ज करू शकतं?
कोणीही व्यक्ती, अल्पवयीन व्यक्ती, विद्यार्थी पॅनकार्डसाठी अर्ज करू शकतात. पॅनकार्ड फक्त माणसांनाच नाही तर कंपनी आणि पार्टनरशीप फर्म पण पॅनकार्ड काढू शकतात. अशा संस्थांकडे ज्या टॅक्स भरतात, त्यांच्याकडे पॅन नंबर असणं आवश्यक असतं.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी पहिले NSDL आणि UTIITSL https://www.utiitsl.com/
वेबसाइटवर जा.
वेबसाइटवर न्यू पॅन ऑप्शनवर क्लिक करा.
संपूर्ण पॅन फॉर्म 49A मध्ये आपली माहिती भरणे, भारतीय नागरिक, एनआरई/एनआरआय आणि ओसीआय (मूळ भारतीय नागरिक) भरू शकतात.
त्यानंतर फॉर्म जमा केल्यावर अर्जदाराला डिमांड ड्राफ्टच्या माध्यामाने ऑनलाईन प्रोसेसिंग फीज भरावी लागते.
फॉर्म आणि फी भरल्यावर शेवटच्या पानावर तुम्हाला १५ डिजीट नंबर मिळेल.
यानंतर NSDL च्या माध्यमातून व्हेरीफीकेशन होईल आणि मग तुम्ही अर्जात दिलेल्या पत्त्यावर 15 दिवसात पॅनकार्ड पोहचेल.
पॅनकार्डसाठी आवश्यक कागदपत्र
एखाद्या व्यक्तीस पॅनकार्ड काढायचे असल्यास,
ओळखपत्र यापैकी कोणतंही -
आधार कार्ड, डीएल, वोटर आयडी
हत्यार असल्यास त्याचा परवाना.
फोटो असलेले पेंशनर कार्ड
राज्य किंवा केंद्र सरकारद्वारे मिळालेलं ओळख पत्र
केंद्र सरकार किंवा माजी सैनिक स्वास्थ्य कार्ड
अॅड्रेस प्रुफ यापैकी कोणतंही-
इलेक्ट्रीसिटी बील, लँडलाइनचे बील किंवा ब्रॉडबँड कनेक्शन बील.
पोस्टपेड मोबाइल बील
पाणी बील
LPG किंवा पाइप्ड गॅस कनेक्शन बील
बँक पासबुक
पोस्ट ऑफीस अकाउंट पासबुक
पासपोर्ट
मतदान ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
प्रॉपर्टीचे कागदपत्र
आधार कार्ड
जन्माचा दाखला यापैकी कोणतेही -
नगरपालिकेचा जन्माचा दाखला
मॅट्रीक्युलेशन सर्टिफीकेट
पेंशन पत्र
पासपोर्ट
मॅरेज सर्टिफीकेट
ड्रायव्हिंग लायसेंस
डोमिसाइल
जन्म तारखेचे अॅफिडेव्हीट
घरबसल्या पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम एनएसडीएलची अधिकृत वेबसाइट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
ला भेट द्या.
Post a Comment