इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? आयकर परतावा कसा भरायचा?
जून-जुलै महिना आला की पावसासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे आयकर परतावा भरण्याची मुदत.
दरवर्षी 31 जुलैपर्यंत हा आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं. पण जेवढं लवकर ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, तेवढं बरंच नाही का?
तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं आणि त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात.
>सर्वात आधी ITR भरणं आणि इन्कम टॅक्स भरणं यातला फरक समजून घ्यायला हवा.
सोप्या शब्दांत सांगायचं, तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR हा एक फॉर्म आहे. या फॉर्मद्वारा तुम्ही भारतात केंद्र सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाविषयी माहिती देता.
याऊलट इन्कम टॅक्स भरणं म्हणजे त्या उत्पन्नावर काही कर असेल तर तो भरणं.
ITR भरण्याआधी तुम्ही कुठल्या उत्पन्न गटात येता, याची माहिती असणं आवश्यक आहे. त्याविषयी इथे सविस्तर वाचा.
>इन्कम टॅक्स रिटर्न कुणी फाईल करायला हवा?
ज्या व्यक्तीचं उत्पन्न सरकारनं घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे बेसिक एक्झेम्पशन लिमिटपेक्षा जास्त आहे, त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरायला हवा. सध्याच्या नियमांनुसार तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही आयकर परतावा भरायला हवा.
तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर आयटीआर भरणं गरजेचं असतं. तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल म्हणजे तुमचं उत्पन्न करपात्र नसेल, तरीही रिटर्न भरलेला चांगला.
कारण आयटीआर भरला असेल तर परदेश प्रवासासाठी लागणारा व्हिसा, क्रेडिट कार्ड, एखादी सरकारी योजना, गृहकर्ज अशा गोष्टींसाठी अर्ज करताना तसंच घर किंवा जमिनीची नोंदणी करताना तुमची विश्वासार्हता वाढते. त्यामुळे रिटर्न वेळेत भरायला हवा.
आपल्याला किती टॅक्स बसतो हे खालील एक्सेल साईटवर पाहु शकता.
💥👆 *वरील शीट ही टॅक्स कॅलक्युलेटेड सॉफ्टवेअर आहे दोन पेज (shit) आहेत पहिल्या शीट मध्ये तीन ठिकाणी फक्त्त बेसिक फरक भत्ते आणि कटिंग टाका दुसऱ्या पेजवर टॅक्स तयार होईल तुम्हाला किती टॅक्स बसेल हे जुन्या आणि नव्या नुसार तयार होईल*
🙏 for Teachers Support only
कुठला ITR फॉर्म भरायचा?
>इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्मचेही काही प्रकार आहेत.
आयकर विभागाच्या वेबसाईटवर त्याची संपूर्ण माहिती दिली असते.
- ITR - 1 : तुम्ही नोकरदार असाल, एकच घर असेल आणि उत्पन्नाचे इतर काही स्रोत असतील आणि कुटुंबाचं एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR-1 सहज हा फॉर्म थेट ऑनलाईन भरता येईल.
- ITR - 2 : तुमचं उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असेल, तुम्ही एखाद्या कंपनीचे डायरेक्टर असाल, शेअरविक्रीतून तुम्हाला फायदा-तोटा झाला असेल, तुमची एकापेक्षा जास्त घरं असतील, परदेशात काही मालमत्ता किंवा उत्पन्न असेल, शेतीतून पाच हजारांवर उत्पन्न मिळत असेल तर ITR -2 हा फॉर्म भरायला हवा.
- ITR-3 : तुम्हाला धंदा किंवा व्यवसायातून उत्पन्न मिळत असेल तर ITR-3 भरायला हवा.
- ITR-4 : तुम्ही संभाव्य उत्पन्नावर कर भरणार असाल तर ITR-4 वापरला जातो. खासगी सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींचाही यात समावेश होतो.
ITR भरण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?
हा कर परतावा दाखल करताना तुम्हाला कोणतीही कागदपत्रं द्यावी लागत नाहीत. पण फॉर्ममध्ये नेमका तपशील भरण्यासाठी किंवा आधी भरलेला तपशील तपासून पाहण्यासाठी या डॉक्युमेंट्स सोबत ठेवणं ITR भरताना मदत करतं.
तसंच जर आयकर विभागानं मागणी केली, तर तुम्हाला ही कागदपत्रं सादर करावी लागू शकतात.
>तुम्ही पगारदार असाल तर कंपनीकडून मिळणारा फॉर्म 16 (ए आणि बी), टीडीएस सर्टिफिकेट्स म्हणजे तुमच्या पगारातून दरमहा कापला गेलेल्या कराची माहिती आणि फॉर्म 26 (ए) तसंच तुमच्या गुंतवणुकीची माहिती तुम्हाला ITR भरताना सोबत ठेवावी लागेल.
फॉर्म 26 (ए) हा तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.
तुमच्या वेगवेगळ्या गुंतवणुकांचा तपशील म्हणजे पीपीएफ, विमा, वैद्यकीय खर्चाच्या पावत्या, भाडेकरार, देणगी, बँकेतील मुदत ठेवींवर मिळालेल्या व्याजाचा तपशील, मालमत्ता किंवा शेअर्सच्या विक्रीतून झालेल्या नफ्यातोट्याचा तपशील. तसंच तुम्ही गृहकर्ज काढलं असेल, तर त्याचे स्टेटमेंट्सही सोबत ठेवा.
तुम्ही पगारदार असाल, आणि कंपनीला गुंतवणूक तपशील दिला असेल, तर यातल्या अनेक गोष्टी तुमच्या फॉर्म 16 मध्ये असतीलच.
- लागणार असेल, तर त्याचं पेमेंट यानंतर करता येईल.
- तुम्ही आता पेमेंटसाठी युपीआयचा वापर करू शकता. क्यूआर कोड स्कॅन करून अगदी लगेच पेमेंट करणं शक्य होतं.
- मग तुम्हाला पुन्हा ईफायलिंग प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
तुम्हाला लगेच किंवा तीस दिवसांच्या आता तुमचे टॅक्स रिटर्न ई व्हेरिफाय करावे लागतील. ई व्हेरिफाय केल्यावर तुम्हाला ट्रँझॅक्शन आयडी आणि अॅटक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. तसंच मोबाईलवर एसएमएसद्वारा आणि रजिस्टर्ड ईमेल आयडीवरही कन्फर्मेशन येईल.
तुमचा जास्तीचा कर कापला गेला असेल, तर ITR भरल्याशिवाय तुम्हाला टॅक्स रिफंड मिळणार नाही.
>आयकर विषयी विशेष माहिती
आपण आयकर विषयी खूप पोस्ट वाचल्या असतील.काहीb नविन बदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे.
1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. कर सवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही.
3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000 रू.गृहकर्ज व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावे आसल्यास 50% वजावट असणार
5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते.
त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव,
राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदी stamp duty इत्यादी .
अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील.
या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात
आयकर इतर सवलती
1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी 75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000रू. ची करात सवलत
2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठ नागरीकांना 30,000रू असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3) अपंग पाल्य आसेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्च आता 50,000 ऐवजी 75,000 व तीव्र अपंग 1,00,000 ऐवजी 1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय दाखला आवश्यक आहे.
4) घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80 डिडि) खर्च 40,000रू.पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 व 80 वया पेक्षा जास्त 80,000 रू.ग्राह्य वैद्यकीय दाखला व10-I फॉर्म भरणे आवश्यक
5) शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
** पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात.
अशा प्रकारे आपण कर सवलती नियोजन करू शकतो.
>आपल्याला वार्षिक पगाराप्रमाणे 2023-2024 साठी किती इन्कमटॅक्स बसतो यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पाहू शकता.
*Income tax Deduction 2023-24 Update* - केंद्रिय अर्थसंकल्प २०२३ मधील पगारदार व्यक्तीसाठी आयकर कायद्यातील नियम व तरतुदी आकारणी वर्ष २०२४-२५ (३१.०३.२०२४)
👉 *पगारी उत्पन्नातून मिळणाऱ्या वजावटी*
*०१) घरभाडे भत्ता :* फलम १० (१३ ए) स्वतःच्या मालकीचे राहते घर नसलेल्या व एकूण वार्षिक पगाराच्या १०% पेक्षा जास्त परभाडे देणाऱ्या कर्मचाऱ्याचा परभाडे भत्ता जास्तीतजास्त मिळणाऱ्या घरभाडे भत्त्याइतका कमी होऊ शकतो. त्यासाठी भाडे पावती लागेल, तसेच घरमालकाचे पॅन क्रमांक ही यावा लागेल.
*०२) प्रमाणित वजावट :* कलम १६: प्रमाणित वजावट ₹ ५०,०००/- किंवा मिळालेला पगार यापैकी कमी असलेली रकम स्टॅण्डर्ड डिडक्शन म्हणून दोन्ही स्किममध्ये बजावटीस पात्र आहे.
*०३) व्यवसाय कर:* कलम १६ (iii): प्रत्यक्ष भरलेल्या व्यवसाय कराची संपूर्ण वजावट या कलमाखाली मिळेल.
*०४) घरबांधणी/खरेदीसाठी* घेतलेल्या कर्जावरील व्याजः कलम २४ (१) (vi): बँका/को-ऑप. बँका यांचेकडून घेतलेल्या दोन परासाठीच्या गृहकर्जावरील व्याजाला र २ लाखांची वजावट मिळेल. तसेच घरदुरुस्तीसाठी किंवा टॉपअप कर्ज घरासाठी घेतले असल्यास र ३०,०००/- ची वजावट मिळेल.
*०५) गुंतवणूकीवरील वजावट (कलम ८० सी)* प्रॉ. फंड, कर बचत म्युच्युअल फंड, विमा हप्ता, पी.पी.एफ., एन.एस.सी., पायाभूत उद्योगाचे बाँड, नाबार्ड बाँड, शैक्षणिक फिज्, पेन्शन फंडात केलेली गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना, घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड, शेडयूल्ड / नॅशनल बँकेत ५ वर्षांकरिता केलेली मुदत ठेव. इ. मध्ये गुंतवणूक / खर्च केल्यास त्याची उत्पन्नातून वजावट मिळते. ही मर्यादा र १.५ लाख आहे.
गोंधळ कमी करण्यासाठी विशिष्ट योजनेत विशिष्ट गुंतवणूक करता येईल अशी मर्यादा काढून टाकली असून एका किंवा त्यापेक्षा जास्त योजनांमध्ये ₹ १.५ लाखांपर्यंत गुंतवणूक / खर्च करुन वजावट मिळवता येईल. ०५अ) (कलम ८० सीसीडी): कलम ८० सीसीडी (२) मध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यातील केंद्र अथवा राज्य सरकारने भरलेल्या १४% अंशदान उत्पन्नाचे निर्धारण करताना संपूर्णपणे वजावटीस पात्र आहे, तसेच कर्मचाऱ्याचे स्वतःचे १०% अंशदान हे कलम ८० सी अंतर्गत वजावटीस पात्र आहे.
*०६) वैद्यकीय विमा योजना (कलम ८० डी)* या योजनेअंतर्गत वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळण्यासाठी असणारी 'मेडिक्लेम पॉलिसी' आणि वैद्यकीय तपासणीसाठी केलेला खर्च (₹ ५,०००/-) स्वतः, स्वतःच्या पती / पत्नी / मुले / आई / वडिलांसाठी केलेली असेल तर ₹ २५,०००/- ची सुट मिळेल.
तसेच या योजनेअंतर्गत जर करपात्र व्यक्तींचे आई वडील हे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या वैद्यकीय विमा व वैद्यकीय खर्चावर ₹ ५०,०००/- ची वजावट मिळेल. वरील दोन्ही प्रकारातील खर्च / हप्ते हे बँकेतून झालेले पाहिजेत.
*०७) नॅशनल पेन्शन स्कीम:* कलम ८० सीसीडी (आयची) या कलमाखाली कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यामध्ये भरलेल्या ₹ ५०,०००/- पर्यंतच्या रकमेला सुट मिळेल.
*०८) उच्च शिक्षणासाठी* घेतलेल्या कर्जावरील व्याजावर सुट (फलम ८० ई) स्वतःच्या पती/पत्नी/मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता घेतलेल्या कर्जावरील भरलेल्या पूर्ण व्याजाची सुट या कलमान्वये मिळेल.
*०९) अवलंबून असणाऱ्या अपंग* व्यक्तीसाठी केलेला वैद्यकीय खर्च व गुंतवणूक (कलम ८० डीडी) या अशा अवलंबून असणाऱ्या व्यक्तीसाठी केलेल्या खर्चाची किंवा गुंतवणूकीची यजावटीची मर्यादा र ७५,०००/- पर्यंत वाढविणेत आली आहे. अपंगत्व हे जर गंभीर स्वरुपाचे (८०% किंवा जास्ती) असेल तर ए १,२५,०००/- एवढी सुट मिळेल.
*१०) अपंगत्व :* (कलम ८० यु): करदाता स्वतः ४०% पेक्षा जास्त अपंग असेल तर या कलमान्वये सुट र ७५,०००/- एवढी आहे. वरील कलमांतर्गत अपंगत्व है जर गंभीर स्वरुपाचे (८०% किंवा जास्ती) असेल तर र ७५,०००/- चे ऐवजी र १,२५,०००/- एवढी सुट मिळेल.
*११) दीर्घ औषधोपचार लागणाऱ्या रोगाच्या उपचारासाठी वजावट (कलम ८० डी.डी.बी.)* काही ठराविक रोगाच्या (मेंदूचे आजार, कैंसर, एडस्, हिमोफिलीया इ.) उपचारासाठी /पुनर्वसनासाठी करदात्याच्या उत्पन्नातून झालेला प्रत्यक्ष खर्च किंवा र ४०,०००/- यापैकी जी रकम कमी असेल ती वजावटीस पात्र राहिल व ही सवलत मिळणेसाठी सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या सज्जा डॉक्टरांचे सर्टिफिकेट व खर्चाचे पुरावे दरवर्षी यावे लागतील. विम्यापोटी किंवा मालकाकडून औषधोपचाराच्या खर्चापोटी काही रकम भरपाई म्हणून मिळाली असेल तर तेवढवाने ह्या कलमाखालील बजावट कमी होईल, आजारी व्यक्ती ६० वर्षावरील असेल तर ₹ १,००,०००/- वजावट मिळेल.
*१२) देणगीवरील सुट :* (फलम ८० जी): मान्यताप्राप्त सार्वजनिक / सामाजिक संस्था अथवा संघटना यांना दिलेल्या देणगीच्या ५०% रकम वजावटीस पात्र राहिल. देणगी एकूण पगाराचे (गुंतवणूक, पजा जाता) १०% पर्यंतच ग्राह्य धरली जाईल, तसेच र २,०००/- वरील देणगी ही रोखीने दिलेली असल्यास मान्य होणार नाही.
*१३) विजेवर चालणाऱ्या ४ चाकी वाहनांवर मिळणारी सुट (८० इ.इ.बी.)* विजेवर चालणाऱ्या ४ चाकी वाहनांसाठी करपात्र व्यक्तीनी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास त्या व्यक्तीस आयकरात त्याने भरलेल्या व्याजाची ₹१,५०,०००/- पर्यंत सुट मिळेल. (कर्ज है १/४/२०१९ ते ३१/३/२०२३ या कालावधीत घेतलेले असावे.
*१४) बँक व्याज :* (कलम ८० टी.टी.ए.): सर्व बँकेतील बचत खातेवरील करदात्याला मिळणारे व्याज र १०,०००/- पर्यंत करमाफ केले असून ₹ १०,०००/- पेक्षा जास्त मिळणारे असे व्याज व सर्व बँकामधील ठेवींवर मिळणारे सर्व व्याज पगारात मिसळून आयकर गणना करावी लागणार आहे. १.४.२०२० पासून बँका / कंपन्यांकडून मिळणारा लाभांश (डिव्हीडंड) करपात्र करणेत आला आहे. (बँकेतील ठेवींवरील व्याज हे आपले पॅनवर ऑनलाईन दिसत आहे)
*१५) (कलम ८७ ए):* नवीन स्किममध्ये करपात्र उत्पन्न ७,००,०००/- चे आत असेल तर बसणारा आयकर किंवा ₹ २५,०००/- यापैकी कमी असलेली रकम सुट मिळेल, तसेच जुन्या स्किममध्ये करपात्र उत्पन्न ५,००,०००/- चे आत असेल तर र १२,५००/- पर्यंत आयकरामध्ये सूट मिळेल.
*१६) वेतन थकबाकी (Arrears)* मिळाली असेल तर सुट (Relief): कलम ८९ (१) : फॉर्म १० ई भरुन वरील कलमाखाली आयकर कमी होऊ शकतो,
*१७) आयकर फायम खाते क्रमांक (PAN)* (कलम १३९ ए) सुधारीत आयकर कायद्याप्रमाणे एकूण मासिक पगार र २०,८३३/- किंवा अधिक असेल व आयकर क्रमांक (पॅन) पेतला नसेल तर आयकर क्रमांक (पॅन) प्यावा लागेल. सदरचे सर्व काम आता युनिट ट्रस्ट/एन. एस. डी. एल. या खाजगी संस्थेकडे दिले असून त्यासाठी आता रंगीत फोटो २, आधार कार्ड व इतर माहिती लागेल. विवरण पत्र दाखल करणे बाबत कलम १३९ ए (१ ए): आकारणी वर्ष २०२४-२५ (आर्थिक वर्ष २०३३/२४) या ) १८ वर्षाकरिता ए २,५०,०००/- पेक्षा जास्ती उत्पन्न असणान्या सर्व व्यक्तींना (आयकर कपात असो वा नसो) विवरणपत्र आय. टी. आर.-१ फॉर्म मध्ये ३१ जुले पर्यंत सादर करावे लागेल. उशीरा विवरणपत्र दाखल केलेस (३१ जुलै नंतर) दंड र ५०००/- पर्यंत लागू शकतो. ५ लाखाचे वर उत्पन्न असाणाऱ्यांना विवरणपत्र ऑनलाईन (E-Filling) भरणे सक्तीचे केले आहे.
*१८) उद्गम कर कपात :* कलम १९२: सदर कलमान्वये मालकाने (Employer) प्रत्येक करपात्र व्यक्तीला वार्षिक आयकर किती बसतो ते काढून सदर बसलेला आयकर हा दरमहा सरासरीने १२ महिन्यामध्ये कपात करुन पगार झालेवर ७ दिवसांचे आत बँकेत चलनाने भरणेचा आहे. न भरलेस किंवा कमी भरणा झालेस उशीरासाठी दरमहा १.२५% व्याज भरावे लागेल, तसेच दरवर्षी अखेरीस एकूण कापलेल्या करासंबंधीचे प्रमाणपत्र फॉर्म नं १६ मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑनलाईनवर काढून प्रत्येक कर्मचाऱ्यास द्यावयाचे आहे.
*१९) तिमाही वेतन विवरणपत्र* (फॉर्म नं. २४ क्यू) पगारातून कपात केलेल्या आयकर कपातीचे विवरणपत्र त्रैमासिक करण्यात आलेले असून दर तिमाही विवरणपत्र फॉर्म नं. २४ फ्यू मध्ये तिमाही संपल्यावर ३० दिवसांचे आत म्हणजे दरवर्षी ३१ जुलै, ३१ ऑक्टोबर व ३१ जानेवारी पर्यंत दाखल करावे लागेल व शेवटचे तिमाही विवरणपत्र दाखल करणेसाठी अंतीम मुदत ३१ मे पर्यंतच राहिल. वरील सर्व विवरणपत्र दाखल करणेस उशीर झालेस विवरणपत्र दाखल करेपर्यंत कलमं २७२ ए प्रमाणे प्रतिदिन २००/- प्रमाणे फीज् भरुन विवरणपत्र सादर करावे लागेल.
*२०) शेअर्स व म्युच्युअल फंड* यांच्या विक्रीवरील भांडवली नफा हा आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून करपात्र केलेला असून असे झालेले सर्व व्यवहार आपल्या पॅनवर ऑनलाईन दिसत आहेत.
*वरील प्रमाणे आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता पगारदारांकरीता आयकराचे सर्वसाधारण नियम आहेत. वरील नियमांचा विचार करुन नियोजनबद्ध गुंतवणूक आताच केली तर बचत होऊन प्राप्तिकरही वाचेल व पुढे ऐनवेळेस होणारी धावपळही कमी होईल.*
Post a Comment