Marathi story मराठी गोष्टी लहान मुलांसाठी

 Marathi story लहान मुलांसाठी मराठी गोष्टी


Marathi story 1) गर्विष्ठ मोर 

एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.

मोर म्हणायचा, "माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.

एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, "किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत."

करकोचा म्हणाला, "मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. "एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. 




Marathi story 2 स्वार्थी मित्र

एका गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव राम आणि शाम. एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले. जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे. 


 ते जंगलाच्या मध्यभागी पोहंचताच अचानक एक अस्वल धावत त्यांच्याकडे येत असताना दिसले. राम स्वताचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण शामला झाडावर चढता येत नाही. शाम घाबरून जातो त्याला काही सुचत नाही आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो. 



अस्वल शामच्या जवळ येते. ते शामला हुंगते. त्यानंतर अस्वल शामच्या कानाजवळ जातो. जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे. शाम भीतीने शांत पडून राहतो. 


थोडया वेळाने, अस्वलाला वाटते की शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो. राम घाबरून खाली उतरतो आणि शामला विचारतो , ' अस्वलाने तुला काय सांगितले रे '..? त्यावर शाम उत्तर देतो की , ""त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा. जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात. त्या मित्राला आपली चूक समजली. 



लहान मुलांच्या गोष्टी Marathi story 2) वाईट संगतीचे परिणाम

एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.


एक दिवशी शेतकर्‍याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला. तो म्हणाला, "अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल." एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला आश्चर्य वाटले.

त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्या बरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले. 


शेतकरी कबुतराला म्हणाला, "तु कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही. तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल." असे म्हणून शेतकऱ्यांने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले. धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्षांना ठार मारले. 


तात्पर्य: वाईट संगतीत राहू नये.


Marathi story 3 पर्वत आणि उंदीर

एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. 'श्रेष्ठ कोण?' यावर ते भांडत होते.

पर्वत म्हणाला, "तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस."


उंदीर पटकन म्हणाला, "मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!"


पर्वत म्हणाला, "मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडकवू शकतो."


उंदीर म्हणाला, "तू त्या ढगांना अडवू शकतोस. पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बिळे करतो. तेव्हा तू मला अडवू शकतोस का?"


छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला. 



तात्पर्य: छोटा असो की मोठा, प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.


एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. 


तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला. 


तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. 


एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले. 


अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, "मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे."


तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, "तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.


आत्मा म्हणाली, "माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे."


"तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही." एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली. 



तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे


एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो. तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो. त्या झाडावर तिथेच भुकेजलेला कावळा बसलेला असतो. त्याला खूप भूक लागलेली असते. 


 तो कावळा नजरचुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो. एक कावळा, भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन बसला. ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याचा तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून, कपटाने त्यांच्या सौंदर्याची तारीफ करू लगला; तो म्हणतो, ‘रे पक्ष्या, मी मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पहाण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसे काय सुंदर ! किती कोमल अहाहा ! तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू ! तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पहातच रहावे ! तुला इतके सर्व अनुकूल आहे, 



त्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल, असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल, तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे!’ ही स्तुती ऐकून आपण कोण, हे कावळा विसरला आणि अंमळ नटूनमुरडून मनात म्हणतो, ‘आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे, तेवढी काढून टाकावी.’ मग त्याने गाण्यास प्रारंभ केला ! तोंड उघडताच त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला, तो घेउन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालता झाला ! 


तात्पर्य:- आपल्या खोटया प्रशंसेस भुलून जे लबाडाच्या नादी लागतात, ते शेवटी बहुत करून फसतात.


एका जंगलामध्ये सुतार लाकूड तोडायला जात असे. त्या जंगलामध्ये काही माकडे राहत होती. एके दिवशी सुतार लाकूड तोडत असताना काही माकडांनी पहिले. 


त्या माकडांना ते पाहून कुतूहल वाटले. दुपारच्यावेळी सुतार जेवण करण्यासाठी घरी जातो. त्यातील एका माकडाला सुताराची फजिती करावीशी वाटते, म्हणून तो तिकडे जाऊन लाकडामध्ये लावलेली पाचार काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात जेवण करून सुतार तिथे येत असतो. 


जेव्हा माकड त्या सुताराला पहातो आणि घाबरून जातो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो परतुं , त्याच वेळेस माकडाची शेपटी लाकडामध्ये अडकते आणि त्या माकडाला पळून जाता येत नाही. सुतार तिथे पोहचल्यावर त्याला माकड दिसते. माकडाचे हे कृत्य पाहून सुतार त्याला खूप मार देतो. 


 तात्पर्य -आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करता कामा नये


Marathi story 7)कपटी साप आणि लाकुडतोड्या

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता. 


थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले. लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले तर कोणी न कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल. 



लाकुडतोड्याने सापाला आपल्या कोटाच्या खिशात अलगद ठेवले आणि घरी घेऊन गेला. घर उबदार होते. घरात शेकोटी पेटविलेली होती. त्याने सापाला शेकोटी जवळ ठेवले. त्याच्या बायकोने सापाला औषध लावले आणि दुध पाजिले. थोड्याच वेळात सापाला बरे वाटू लागले. लाकूडतोड्याच्या मुलांना साप खूप आवडला होता. 


एक मुलगा सापाला प्रेमाने गोंजराण्यासाठी पुढे जाऊ लागला. सापाच्या जवळ जाऊन मुलगा त्याला हाताळणार एवढ्यात सापाने बाळाला दंश करण्यासाठी फणा काढला. हे पाहून लाकुडतोड्याने क्षणाचीही दिरंगाई न करता आणि उपकार न जाणणाऱ्या सापाचे कुऱ्हाडीने तुकडे केले. 


ज्या लाकुडतोड्याने त्याचे प्राण वाचविले होते त्याच्याच मुलाला दंश करण्यासाठी साप पुढे सरसावला आणि प्राण गमावून बसला. 


************************* *बोध कथा* ************************* *उपकार स्मरण करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे....* ---------------------------------------- *कथा* एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. *अचानक त्याच्या मनात आले,नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे.* तो नदीवर गेला.हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. *त्याला पोहता येत नव्हते.त्याची धडपड सुरू झाली.* तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना. *अखेर,एका साधूने नदीत उडी घेतली.त्या साधूने त्याला वाचविले.काठावर आणले.* काही वेळाने,तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला.*त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या.पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली.* हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले,त्यांनी त्या व्यापार्‍याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला,*'थांबा,त्यांने स्वत:च्या किंमती एवढेचं बक्षिस दिले आहे.यात त्याची काय चूक?त्याची किंमत एवढीच आहे.'* *बोध* *माणसाची खरी किंमत प्रसंगानेचं कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे.*



Post a Comment

Previous Post Next Post