संकलित मुल्यमापन परीक्षा pAT गुण नोंद करणेबाबत

 संकलित मुल्यमापन परीक्षा(PAT) सञ-2 परीक्षा गुण Swift chat

 

STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन- २(PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु-ट्युबद्वारे देण्यात येतील.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ठीक १२:०० ते १:०० या कालावधीत यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल. संबधित शिक्षकांनायाबाबतचे प्रशिक्षण यु-ट्युबद्वारे घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी. सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन २ (PAT-३) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटवॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोवत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.qle/9ssWv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.

तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.

यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन) दि १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.००


PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :

https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RI QhbVIj2D7qQgW5Zj6/view?usp=sharing संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)
https://cqweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7https://cqweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7












महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई (MPSP, Mumbai) अंतर्गत विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे Attendance Bot बाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या समस्यांची उत्तरे समस्या १. Invalid U-DISE कोड शाळेतील रेकॉर्डस, शाला मान्यता प्रपत्र व UDISE प्रपत्र यावर UDISE कोडची पडताळणी करावी. तालुका समग्र शिक्षा डेटा ऑपरेटरशी संपर्क करुन UDISE कोड ची पडताळणी करावी. समस्या २ Invalid मोबाईल क्रमांक सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर मुख्याध्यापक / DDO-1 यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षण अधिकारी /DDO-2 यांनी approval दिल्यानंतर किमान ८ दिवस प्रतीक्षा करा. हाच मोबाईल नंबर UDISE पोर्टल व सरल प्रणाली वर सुद्धा नोंदविण्यात यावा. समस्या ३ Invalid शालार्थ / शिक्षक आय.डी. मुख्याध्यापक / DDO-1 यांच्याकडून शालार्थ पोर्टलवरून शिक्षक आय. डी. प्राप्त करून घ्यावा. तसेच, शालार्थ आय. डी. व UDISE कोड विसंगत असल्यास अपडेट करावा. ६ समस्या ४ उपस्थिती चिन्हांकित होत नाही. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावे सरल व UDISE पोर्टल वर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल. समस्या ५ पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे. वेतन प्रणाली, शालार्थ पोर्टल व UDISE वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी. अन्यया जुन्या शाळेच्या पोर्टल वर नावे दिसत राहतील. सेवानिवृत शिक्षकांची नावे वेतन प्रणाली मधून DELETE करावी. समस्या ६ मदरसा मध्ये जाणारे विद्यार्थी शालार्थ वेतन प्रणालीतून वेतन मिळत असल्यास सदर मदराश्यातील विद्यार्थ्यांची माहिती भरता येते. समस्या ७ मागील वर्गातील विद्याथ्यांची नावे दिसत आहे. विद्यार्थ्याचे सरल पोर्टल वर पुढील वर्गात प्रमोशन करावे व यादी अपडेट करावी. समस्या ८ शिक्षण हमी कार्ड दिलेले विदयाथी सदर विद्यार्थ्यांची सरल पोर्टल वर New Tab घेऊन इयत्तनिहाय नोंद करावी. New Tab करता तालुका समय शिक्षा ऑपरेटरशी संपर्क करावा. समस्या ९ सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत वेतन प्रणाली/ शालार्थ पोर्टल व UDISE वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अदययावत करावी. समस्या १० सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत आपल्या वर्गातील मुलांची नावे सरल व UDISE पोर्टल वर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल. समस्या १९ शून्य शिक्षक असलेली शाळा सध्या माहिती भरू नये. अधिकृत शिक्षक नेमणुकीनंतर माहिती भरावी. आम्हाला आशा आहे की वरील उत्तरे आपल्या समस्या सोडवतील. पुढील कार्यास आमच्या शुभेच्छा.

Post a Comment

Previous Post Next Post