ऐका. म्हणा. चाचा.
प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा
हसा मुलांनो हसा ।। धृ.।।
तुम्हां बोलवी ती फुलराणी
खेळ खेळती वारा पाणी
आनंदाच्या शिखरावरती, खुशाल जाउन बसा ।। १ ।।
रडणे हा ना धर्म आपुला
हसण्यासाठी जन्म घेतला भारतभूच्या आदर्शाचा, मनी उमटु दे ठसा ॥ २॥
सर्व मागचा विसरा गुंता
अरे उद्याच्या नकोत चिंता
बघा, अरुण तो बाळांनो रे, तुम्हां खुणवितो कसा || ३
||
- उमाकांत काणेकर
स्वाध्याय चाचणी सोडवा
Post a Comment