शिक्षक दिन मराठी भाषण

शिक्षक दिन भाषण मराठी भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी केली जाते. शिक्षक दिन हा सर्व शैक्षणिक संस्थांसाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे .
 गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण जगी न होई सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदूया गुरुराया,
     अनेक कालखंडापासून आपल्या देशामध्ये गुरुपरंपरेला फार महत्त्व आहे. पूर्वी या देशामध्ये गुरूच्या कुलात जाऊन विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत होते. त्या पद्धतीला गूरुकुल शिक्षण पद्धती असे आपण म्हणतो. आज या देशामध्ये मुले शाळेत जाऊन शिकू लागली. पूर्वा शिक्षण हे वनामध्ये दिले जायचे. आज शिक्षण हे शाळेमध्ये दिले जाते. विद्यार्थ्यांची जडणघडणीत त्याच्या गुरुजनांचे योगदान महत्त्वाचे असते. आपल्या देशामध्ये त्याच गुरुजनांचा सन्माननीय शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा आढावा, मागोवा लोकांनी घ्यावा याचसाठी शिक्षक दिन हा साजरा केला जातो. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 
 चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. 
 एक सामान्य माणूस, उत्तम शिक्षक ते उत्तम प्रशासक या देशाचे राष्ट्रपती हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा प्रवास सर्वांच्या समोर आदर्श प्रेरणादायी पहावयास मिळतो. आज शिक्षक दिन साजरा करत असतांना आपण आपल्याला ज्ञानाचे, जीवनाचे, आयुष्याचे, कला, क्रीडा, साहित्य यासारख्या क्षेत्रामध्ये आपणास घडवणाऱ्या गुरुवर्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करत असतो. शिक्षक तन, मन, धन, अर्पण आणि समर्पित करून एक पिढी घडविण्याचे पवित्र कार्य करत असतात. या देशामध्ये शिक्षण हे पूर्वी विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, पण हे शिक्षण आजसर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले. या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक आपणास आपलं आयुष्य संस्कारमय, शिस्तबद्ध परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असत. याचाच आदर्श आपण घेतला पाहिजे.  
 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ 
    याप्रमाणे शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. अज्ञांनी मुलाला ज्ञानी बनवतो. विद्यार्थ्यांमधील दुर्गुण बाजूला काढून त्याच्या सद्गुणाना वाव देतो. उत्तम खेळाडू, उत्तमप्रशिक्षक, उत्तम वक्ता, उत्तम वैज्ञानिक घडविण्यासाठी शिक्षक हे अविरत पणे कार्य करत असतात. समाजाला अशा शिक्षकांची गरज असते. आज देशभरात जगभरात शिक्षकांच्याकडे पाहिले तर हे शिक्षक विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार करत असतात. शिक्षकांना सर्वांत जास्त आनंद केव्हा मिळत असतो. आपला एखादा विद्यार्थी सामान्य असेल, पण तो जेव्हा त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून ज्यावेळी समाजात वावरत असतो. त्यावेळी शिक्षकांना आनंद होत असतो. आज शिक्षकांनी आपल्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श ठेवण्याचे कार्य करतात. व्यक्ती मनुष्य आणि विद्यार्थी समाज या सर्व गुणांचा अभ्यास करून शिक्षक एक विचारांची चौकट आपल्यासमोर निर्माण करतात यातून आपण गुरुजनांच्या विचारांचा आदर्श घेतला तर एक नवा समाज, नवी पिढी निर्माण होऊ शकते. चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. शिक्षण हे प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन काहीतरी शिकवण्याचे कार्य करते. तर शिक्षक आपल्याला कृतिशील व्यक्ती बनवण्याचे कार्य करतात. शिक्षक दिनाच्या माध्यमातून या देशामधील करोडो शिक्षकांच्या विचारांनुसार आपण जर आपली योग्य पद्धतीने वाटचाल केली तर एक संस्कारमय, संस्कृतीरक्षकं, वैज्ञानिक दृष्टिकोण असणारा विद्यार्थी समाजातून निर्माण होऊ शकतो. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी गुरुजींच्या वाणीतून व कृतीतून येणाऱ्या गोष्टींचा संग्रह करून आपण वाटचाल केली तर यशाचा आनंदसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. यासाठीच शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रामाणिकपणे पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गुरुजींच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे. 
   गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक 
_____________________________________
         विद्यार्थी भाषणे 
 भाषण १ 
      आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो / करते. शिक्षक आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ते आपले दुसरे पालकच आहे, ते आम्हाला मार्गदर्शन करतात आणि देशावे जवाबदार नागरिक घडविण्यास मदत करतात. देशाचे भवितव्य घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. तुमच्यामुळेच आम्हाला ज्ञान आणि बुध्दी  प्राप्त झाली आहे. तुम्हीच आमच्या आयुष्याला आकार दिला आहे आणि तुम्हीच आम्हाला चांगले व्यक्ती बनण्यास मदत केली आहे. तुम्ही नेहमीच आमच्यासाठी कार्यतत्पर आहात, आम्हाला मार्गदर्शन केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुमचे खरोखरच आभारी आहोत. तुम्ही आमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन हा एक योग्य दिवस आहे. 
जरी बदलला काळ तरी,
 सदैव संस्कारांचे रक्षक, 
 बोधामृत पाजून ज्ञानाचे
 राष्ट्र घडविती शिक्षक
 शिक्षकांनी समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी जगभरात या शिक्षक दिनी, मी माझ्या जीवनातील प्रवासात ज्यांनी मला योग्य दिशा दाखवली, मार्गदर्शन केले, त्या सर्व शिक्षकांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो, इच्छिते. तुमच्या संयम, मार्गदर्शन आणि समर्थनाबद्दल धन्यवाद, पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो/ देते! 
--------------------------------------------
          विद्यार्थी भाषणे 
 भाषण -२ 
     आदरणीय व्यासपीठ, सर्व गुरुजन व येथे उपस्थित माझ्या बालमित्र-मैत्रिणींनो, आज आपण येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. शिक्षक दिनानिमित्त आज मी जे बोलणार आहे ते शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. 
 जगी आहे त्यांना मान
 घडविली ज्यांनी भावी पिढी. •
असावे मुखी तुमचे गुणगान
 उभारती ज्ञानरुपी गुढी.

 आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हे दुसरे पालक असतात, ज्ञानरूपी गुढी उभारून आपल्या जीवनाला योग्य आकार देतात. मार्गदर्शन करतात. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकतो. समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. ते भावी पिढ्यांना शिक्षित आणि प्रशिक्षित करतात. शिक्षक विद्याथ्यांच्या मनाची योग्य संस्कारमुल्ये रुजवून जडनघडन करतात आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवणयास मदत কरतात. शिक्षक दिन हा शिक्षकांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानण्याची संधी आहे. या शिक्षक दिनी, मी माझ्या जीवनातील प्रवासात ज्यांनी मला मदत केली त्या सर्व शिक्षकांचे भी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करू इच्छितो इच्छिते. तुमचे प्रेम, आशिर्वाद सदैव पाठीशी असू द्या. आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

 विद्यार्थी भाषणे 
 भाषण -३ 
   सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आजचा हा दिवस म्हणजे आपल्या शिक्षकांविषयी ऋण व्यक्त करण्याचा दिवस.
 भावी पिढी घडविण्याचे काम होते ज्यांच्या हातून संस्कारांचे बीज पेरता बालकांच्या मनामनातून 
 जगात सर्वदा आदरणीय ठरती शिक्षक
 सदैव व्हावे त्यांच्या चरणी नतमस्तक
 शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं, कारण शिक्षक योग्य संस्कार व ज्ञान देऊन मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई- वडिलांनंतर शिक्षकांकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायता मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजण्यासाठी आणि शिक्षकांपती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. शिक्षक हे एकाच बागेत वेगवेगळ्या रूप आणि रंगाचे फुलं सजवणाऱ्या माळ्याप्रमाणे असतात. विद्यार्थ्यांना काट्यांवर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात. आज प्रत्येक घरात तंत्रज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून शिक्षा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न असतं आणि ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिक्षक जिवाचे रान करत असतात. म्हणून शिक्षक है सन्मानाचे हक्कदार आहेत. अशा सर्व शिक्षकांना शतशः नमन!

Post a Comment

Previous Post Next Post