15ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी भाषणे


 स्वातंत्र्य दिन मराठी भाषणे -1

“ज्याचा मुकूट आहे हिमालय,

जिथे वाहते गंगा…

जिथे आहे विविधतेत एकता,

सत्यमेव जयते आहे आमचा नारा ….

जिथे धर्म आहे भाईचारा

तोच आहे भारतदेश आमचा….!”


आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजन इथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

तर सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप- खूप शुभेच्छा !

१५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. तसेच भारताचा एक राष्ट्रीय सण आहे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाचे योगदान दिले. आपण सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे.

त्या सर्व शुर स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत.


या दिवशी देशाचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवितात व तसेच राष्ट्रध्वजास २१ तोफांची सलामी दिण्यात येते.


तसेच या दिवशी सर्व शाळा, महाविद्यालये व कार्यालयांमध्ये ध्वजारोहण, ध्वजवंदन व देशभक्ती वर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे, आपण सर्वांनी मिळून भारत देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करू.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते :-


तिरंगा आमुचा ध्वज,

उंच उंच फडकवू….

प्राणपणाने लढून आम्ही,

शान याची वाढवू….



बोला – भारत माता की जय !

वंदे मातरम् ! वंदे मातरम् !



स्वातंत्र्य दिन मराठी भाषणे 2

भाषण 2


“उत्सव तीन रंगांचा….

आभाळी आज सजला !

नतमस्तक मी त्या सर्वांचा….

ज्यांनी भारत देश घडवला !!”


सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय देशबांधवांनों सर्वांना माझा नमस्कार !



आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजन आज इथे भारताचा ७७ वा ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !


मित्रांनी, १५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले.


महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई सरदार बल्लभभाई पटेल, मंगल पांडे अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले.


आज आपण मुक्तपणे श्वास घेतोय त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे. अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन ….


आजच्या या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवितात. हा सण मोठ्या उत्साहात शाळा व महाविद्यालयात साजरा केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मिरवणुका काढल्या जातात. घोषणा दिल्या जातात. सगळीकडे देशभक्तीची गाणी लावली जातात.


स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत. त्यावर देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे.


चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला एक आदर्श व सर्वोत्तम देश बनवूया. शेवटी मी एक छोटीशी कविता बोलून माझे भाषण संपवते :-


तिरंगा आमुचा भारतीय झेंडा….

उंच-उंच फडकवू !

प्राणपणाने लढून आम्ही….

शान याची वाढवू !!


जय हिंद ! जय भारत !!


स्वातंत्र्य दिन भाषणे  pdf download करा

       Click Here 

Post a Comment

Previous Post Next Post