क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची माहिती

 


झेलूनिया अंगावरती
     शेना मातीची घान |
     दिले विद्येचे ज्ञान
     लेकी कराया सज्ञान |"

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव खंडोजी नवसे होते. सावित्री बाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी १८४० मध्ये झाला.


सावित्रीबाई फुले शिक्षण जगतात स्मरणात आहेत, कारण सावित्रीबाई फुले अशा स्त्री होत्या ज्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी लढा दिला आणि स्त्रियांना शिक्षित करण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले या कवयित्री, शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या.सावित्रीबाई फुले या आधुनिक महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर स्त्री-सुधारक होत. त्यांचा जन्म इ. स. १८३१ मध्ये झाला. प्रसिद्ध समाजसुधारक जोतीराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जोतीरावांनी त्यांना शिक्षण दिले. सावित्रीबाईंचे विचार बंडखोरीचे होते. म्हणून त्या जोतीरावांच्या कार्यात सहभागी झाल्या.


सुरुवातीला सावित्रीबाईंनी हळदीकुंकू समारंभ आयोजित केले. त्या निमित्ताने त्यांनी सर्व जातींतील स्त्रियांना एकत्र आणायचा प्रयत्न केला. इ. स. १८४८ मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा जोतीरावांनी सुरू केली. त्या शाळेत त्या शिकवू लागल्या. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देण्यास समाजाचा कडाडून विरोध होता. स्त्रियांना त्या शिकवतात, म्हणून लोकांनी त्यांच्यावर दगड, शेण फेकले. त्यांची निंदानालस्ती केली. तरीही त्या डगमगल्या नाहीत.

जिंदगी एक काटो का सफर है,

हौसला उसकी पहचान है,

रास्तो पर सभी चलते है,

पर जो रास्ते बनाये वही इन्सान है.

सावित्रीबाई या लेखिका व कवयित्री होत्या. त्यांनी ‘काव्यफुले’, ‘जोतीबांची भाषणे’ वगैरे ग्रंथ लिहिले. जोतीरावांच्या मृत्यूनंतरही त्यांनी आपले कार्य धडाडीने चालूच ठेवले. इ. स. १८९६ मध्ये पुण्यात दुष्काळ पडला. त्या दुष्काळात व नंतर प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णसेवा केली. त्याच साथीत प्लेगची लागण होऊन इ. स. १८९७ मध्ये त्यांचे निधन झाले.स्त्रियांच्या इतिहासात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका हा बहुमान पटकावणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस ‘बालिका दिन‘ म्हणून साजरा केला जातो.


सावित्रीबाई फुले यांचा विवाह १८४० मध्ये झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या. त्यांचे पती जोतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले हाते. जोतिबांनी स्वतः सावित्रीबाईंना लिहायला, वाचायला शिकवले. त्या काळी स्त्रियांनी शिकणे महापाप मानले जाई; पण जिद्दी, करारी सावित्रीबाईंनी जुन्या परंपरेला तडा देऊन शिक्षण घेतले.


महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी इ. स. १८४८ साली मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू करून एक नवा इतिहास रचला. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला; पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. मुलींना शिकवायला जात असताना लोकांची दगडफेक झाली, लोकांनी त्यांच्या अंगावर शेणाचा मारा केला. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. सनातन्यांच्या धमक्यांना सावित्रीबाईंनी भीक घातली नाही.


१५ मे १८४८ मध्ये पुण्यातील हरिजनांच्या मुला-मुलींसाठी शाळा काढून फुले दांपत्याने क्रांतीचा पुढचा टप्पा गाठला. सावित्रीबाई फुल्यांनी दीन-दुबळ्यांना, शेतमजुरांना, अनाथांना, विधवांना आधार दिला. उपेक्षितांच्या जीवनात चैतन्य निर्माण केले. त्यांनी बालविवाहाविरुद्ध आवाज उठविला. बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. विधवांच्या केशवपनाला विरोध केला.


सावित्रीबाई फुल्यांनी एका विधवा स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या ‘यशवंत’ नावाच्या मुलग्याला दत्तक घेतले. अशा या महान स्त्रीने सर्व स्त्रीजातीला ‘साक्षर व्हा, निर्भय व्हा’ असा संदेश दिला.सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे लग्न अगदी लहान वयात म्हणजे नवव्या वर्षीच जोतीराव फुले यांच्याबरोबर झाले. जोतीरावांनी त्यांना लिहायला, वाचायला शिकविले.


सावित्रीबाई या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांनी मुलींना पुण्यातील एका शाळेत शिकविले. पण त्याकाळी लोकांना हे आवडणारे नव्हते.


लोकांनी त्यांना दगड मारले. तरीही त्या घाबरल्या नाहीत. सावित्रीबाई नेहमी म्हणत की एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं. म्हणून स्त्रियांनी, मुलींनी शिकायला हवे.


जोतीरावांच्या मृत्यूनंतरही त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन प्लेगच्या रोग्यांची सेवा केली. शेवटी त्यांनाही प्लेगने गाठले आणि त्यांचे निधन झाले.

त्यांची कीर्ती व कार्य फार मोठे आहे.


            भाषण

जिंदगी एक काटो का सफर है,

हौसला उसकी पहचान है,

रास्तो पर सभी चलते है,

पर जो रास्ते बनाये वही इन्सान है.


भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या भारतीय शिक्षणाची ज्ञानगंगोत्री क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन.



18 व्या शतकाचा काळ होता. स्त्रियांचे जीवन चूल आणि मूल पर्यंत मर्यादित होते. स्त्रियांनी शिक्षण घेणे, पाप समजले जायचे. अशा या 18व्या शतकात 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, जिल्हा सातारा येथे ‘सावित्रीबाई फुले’ यांचा जन्म झाला व एका नव्या अध्यायास सुरुवात झाली.< /p>


म्हणूनच तर म्हणतात –

बेटीया सबके नसीब में कहा होती है,

रब को जो घर पसंद आये,

वहा बेटीया होती है !


परंतु आजचा काळ बदलला. वेळ बदलली पण लोकांची मानसिकता बदलली नाही. आजही आपल्याला म्हणावे लागते ‘बेटी बचाव बेटी पढाव!’


सावित्रीबाई स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलींनाही शिकवले. आज बस कंडक्टर पासून तर राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. पण आज स्त्रिया शिक्षित होऊ शकल्या ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच.


शेवटी भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी एवढेच म्हणेन.


बोये जाते है बेटे

पर हो जाती है बेटिया

स्कूल जाते है बेटे

पर आगे बढ जाती है बेटिया

मेहनत करते है बेटे

पर अवलाती है बेटिया

जब रुलाते है बेटे

तब हसती है बेटिया

नाम करे ना करे बेटे

पर नाम कमाती है बेटिया

आशा रहती है बेटो से

पर पुरी कर जाती है बेटिया.


एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.

जय हिंद जय महाराष्ट्र

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post