26 जानेवारी भाषण /प्रजासत्ताक दिन भाषण

 26 जानेवारी भाषण


26 जानेवारी भाषण १

शाळा सजवा, काढा रांगोळ्या करु या तयारी ! 

आली हो आली 26 जानेवारी !! 

वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण ! 

कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!

 सन्मानिय व्यासपीठ  आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे प्रिय शिक्षक आणि माझ्या प्रिय देशवासियांनो,



 आज आपला भारत देश आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे.  हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे.  या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.


15 ऑगस्ट १९४७ ला आपला देश ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला.  स्वातंत्र्यानंतर आपला देश नीट चालवण्यासाठी कोणताही नियम व कायदा नव्हता.  त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारताची मजबूत राज्यघटना तयार केली.  



राज्यघटना अंमलात आली तारीख 26 महिना जानेवारी !


 फडकवून तिरंगा करू साजरी लोकशाहीची ही भरारी..!




26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाने आपली राज्यघटना लागू केली.  त्यावेळी आपला देश सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला होता. 


 आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.  या महान संविधानाने आपल्याला आपल्या हक्कांसाठी आणि हक्कांसाठी लढण्याचे बळ दिले आहे.


 आपला देश स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही.  आज आपण त्या सर्व शूर वीरांना मनापासून स्मरण करतो, त्यांच्यामुळेच आज आपण शांततेचा श्वास घेत आहोत.  स्वातंत्र्याच्या वर्षांनंतरही आपल्या देशाचे शूर सैनिक सीमेवर शत्रूंचा मुकाबला करत जीव तळहातावर घेत आहेत.  मातृभूमीसाठी ते मरायला सदैव तयार असतात.


शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन....


 लहरतो आहे तिरंगा अभिमानाने,


उंच आज या आकाशी, 


उजळत ठेवू सारे रंग त्याचे,


घेऊया प्रण हा एक मुखाने


जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय  !




<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3153504779014806"

     crossorigin="anonymous"></script>

<ins class="adsbygoogle"

     style="display:block; text-align:center;"

     data-ad-layout="in-article"

     data-ad-format="fluid"

     data-ad-client="ca-pub-3153504779014806"

     data-ad-slot="2328094524"></ins>

<script>

     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

</script>

26 जानेवारी भाषण -2

उत्सव तीन रंगाचा आज सजला

नतमस्तक मी त्या सर्वांचा

ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला



माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या देशबांधवानो,


आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


मित्र हो, १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त, स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सूखासमाधानाने, शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस अथक परिश्रम घेवून देशाचे समृद्ध संविधान तयार केले. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले; देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला, आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क-अधिकार मिळालेले आहेत.


आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. आज त्या सर्व शूर वीरांना आपण वंदन करुया, कारण त्यांच्यामुळे आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सदैव सन्मान करूया.



थोर आमची भारतमाता,

आम्ही तिचे संतान,

आमुचा भारत देश महान।

बोला, भारत माता की जय, वंदे मातरम।

_______________________________________


<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3153504779014806"

     crossorigin="anonymous"></script>

<ins class="adsbygoogle"

     style="display:block; text-align:center;"

     data-ad-layout="in-article"

     data-ad-format="fluid"

     data-ad-client="ca-pub-3153504779014806"

     data-ad-slot="2328094524"></ins>

<script>

     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

</script>


26जानेवारी चारोळ्या

चला सारे करूया,

आपल्या संविधानाचा आदर

ज्याने दिला जगण्याचा,

शिकण्याचा अधिकार


उत्सव तीन रंगाचा,

आभाळी आज सजला..

नतमस्तक मी त्या सर्वांचा,

ज्यांनी भारत देश घडवला…


मतभेद सारे विसरूया,

बंधने सारे तोडूया…

एकमनाने, एक भावनेने,

आज पुन्हा एक होऊया…


तनी मनी बहरू दे नवजोम,

होवू दे पुलकीत रोम रोम…

घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंच उंच,

जयघोष मुखी जय भारत, जय हिंद…


टिकून राहो एक्य भारताचे

येवो समृद्धी अंगणी

वाढो आनंद जीवनी

फडकत राहो सदा विजयी पताका,

गणराज्य दिनाच्या मंगलक्षणी,

तुम्हासाठी हा स्वागत सोहळा…



शाळा सजवा, काढा रांगोळ्या

चला करूया तयारी

आली हो आली 26 जानेवारी…


विविधतेत एकता,

आहे आमची शान

म्हणूनच आहे अवनी राहणार

आमचा भारत देश महान..


भारत देश, आमुचा महान

स्फूर्ती देते आमचे संविधान..


देश विविध रंगांचा,

देश विविध ढगांचा

हा देश आहे

विविधता जपणाऱ्या आमुच्या एकात्मतेचा


मतभेद सारे विसरूया,

बंधने सारे तोडूया,

एक मनाने, एकजुटीने

कायम एकत्र राहू या


असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान !

गाऊ त्या भारत मातेचे गुणगान !!


स्वर्गाहूनी प्रिय आम्हाला

आमुचा सुंदर देश,

आम्ही सारे एक,

जरी नाना जाती, नाना वेश.


असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी

अनेकांनी दिले बलिदान…

वंदन तयांसी करूनिया आज

गाऊ भारत मातेचे गुणगान…


भारत देश महान आमुचा,

भारत देश महान

स्फूर्ती देतील हेच आमचे

राम, कृष्ण, हनुमान !!


उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची

मंगलमय प्रभात.

देशभक्ती, देशप्रेम संचारले आज चराचरात

भारत मातेला वंदन करूनी

करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात.


पाहुनी त्यांचा पराक्रम

इंग्रजांचे काळीज ही भीतीने धडधडले रे

त्या स्वतंत्र वीरांमुळेच

भारत भूमीवर तिरंगा ध्वज फडफडले रे



शाळा सजवा, काढा रांगोळ्या करूया तयारी !

आली हो आली 26 जानेवारी !!

वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण !

कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!


झेलल्या स्वातंत्र्यवीराने गोळ्या आपल्या निधड्या छातीवर !

म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर !!


न नातालगांची आस, न संसाराची कास

होता फक्त स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास !!

म्हणून तर त्यांनी हसत हसत स्वीकारले

मृत्यूचे फास !!


जगले ते देशासाठी अन देशासाठीच हुतात्मा झाले !

भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले!!


प्रत्येक मनोमनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी

ठेवा तुम्हीही आठवण !!

तरच सार्थकी ठरेल

आजचा हा प्रजासत्ताक दिन !!


गणराज्य दिनाला

ध्वजवंदन हे

अखंडतेची ही महती

व्यक्त करतो आदर आम्ही

भारतीय संविधाना प्रति


विविधतेतून एकता

वैशिष्ट्य आहे भारताचे

शुभेच्छांचा वर्षाव हा

अवचित्य आहे

गणराज्य दिनाचे


देशभक्तीपर गीत गाऊनी

वंदन करतो राष्ट्रध्वजाला

मातृभूमीची गौरव गाथा

गर्वाने गातो

गणराज्य दिनाला


स्वातंत्र्य, समता, बंधुता

हाच आहे घटनेचा पाया

लोकशाही बळकट करण्या

संविधान जागर करूया

संविधान जागर करूया



आम्ही सारे भारतवासी

एवढं एकच भान राखू

असू कुठेही जगावरती

तिरंग्याची शान राखू


हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई

जिथे बंधू भावाचे व्रत आहे

त्या सुंदर देशाचे नाव

फक्त भारत आहे

फक्त भारत आहे


तिरंगा आमचा भारतीय झेंडा

उंच उंच फडकवू

प्राण पणाने लढून आम्ही

शान याची वाढवू


ज्या भूमीवर वाहते

गोदावरी, कृष्णा, यमुना, गंगा,

हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो

अभिमानाने तिरंगा..


निळ्याभोर आकाशात

फडकवली तिरंग्यांनी शान,

साऱ्या जगात मिरवूणी

भारत माझा महान.


देश आपला सोडो न कुणी,

नातं आपलं तोडो न कुणी

भारत देश आपली शान आहे

ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.


रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा

उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा

जयघोष भारताचा आसमंती गुंजावा

सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा.


हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.


सलाम करा या तिरंग्याला,

जी तुमची शान आहे…

मान नेहेमी वर उंच ठेवा,

जो पर्यंत प्राण आहे…


लहर तो आहे तिरंगा अभिमानाने

उंच आज या आकाशी

उजळत ठेवू सारे रंग त्याचे

घेऊया प्रण हा एक मुखाने


हिंदी चारोळ्या


मुस्कुराती है आज दिशाए

गुंगुनाती है हवाए !

तहे दिल से देता हु सबको

गणतंत्र दिन की

शुभकामनाए!!


सागर जिसके पाव पखारे

हिमालय जिसका सरताज है !

गुंज रहा दुनिया मे डंका भारत का

खुशियों का दिन आज है

खुशियो का दिन आज है !!


स्वतंत्रता असे खुशाली है

समता से सब एकसमान !

बंधुता हमको बांधे रखती

गणतंत्र होता बलवान !!


पंछी कलकल करते जाते

झरझर झरते झरनो पर !

शीश झुकाकर नमन करे हम

भारत माँ के चरणोपर !!


आंधीयो को रोक के

मोड के दिखायएंगे !

जलते है जो हमसे

उनको और भी जलायेंगे !!

शान से हम ये तिरंगा

चांद पर फहराएंगे !!!

हम आगे बढते जायेंगे

हम आगे बढते जायेंगे…


हे भारत माँ,

धरती से अंबर तक

हम तेरी जय जय कार करेंगे

अमर रहेगा नाम तुम्हारा

युगोयुगोतक दुनिया मे

कुछ ऐसा काम करेंगे

कुछ ऐसा काम करेंगे..


नही करेंगे नही झुकेंगे

बढते जाए आगे हम

परिवर्तन की पावन आधी

लाकर ही हम लेंगे दम

अब हो रहा सवेरा है

अब हो रहा सवेरा है

चलो जलाये दीप वहा

जहा अभी भी अंधेरा है…


न जाने कितनो ने जान गवाई, न जाने कितनी खून की नदिया बहाई !

तब जाके भारत हो आजादी मिल गई !!


वह शाम जो काम आये अंजुमन के लिये,

वो जजबा जो कुर्बान हो जाये वतन के लिए

रखते है हम हौसले भी जो मर मिटे हिंदुस्तान के लिए.


चलो फिरसे खुद को जगाते है

अनुशासन का दंडा फिर से घुमते है

याद करें उन शूर वीरो की कुर्बानी

जिनके कारण

हम इस लोकतंत्र का आनंद उठाते है.


हम खुशी बाटते दुनिया को

हम हसते और हसाते है !!

सारे जग मे सबसे अच्छे,

हम भारतीय कहलाते है

हम भारतीय कहलाते है !!


अनेकता मे एकता,

ही हमारी शान है !

अनेकता मे एकता,

ही हमारी शान है !!

इसलिये सारे जग मे

मेरा भारत महान है

मेरा भारत महान है !!

4 Comments

Post a Comment

Previous Post Next Post