धरतीची आम्ही लेकरं । भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं ।। ध्रु ।।
शेतावर जाऊया । सांगाती गाऊया रानीवनी गाती जशी रानपाखरं ।। १ ।।
मेहनत जिमनीवरी । केली वरीसभरी । आज आलं फळ त्याचं डुले शिवार ।। २ ।।
शाळु, जुंधळा मोती चमचम चमकत्याती ।
मोत्यांची सालभरी खाऊ भाकर ।। ३ ।
स्थापू समानता, पोलादी ऐक्यता । नाही धनी येथ कुणी नाही चाकर । ४ ।
धरतीची आम्ही लेकरं । भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं ||
- द. ना. गव्हाणकर
स्वाध्याय सोडवा
धरतीची आम्ही लेकरं इयत्ता चौथी मराठी
Suresh Sude
0
Post a Comment