सुगी
रानातल्या बोरीला
बाजून आली थंडी,
काट्यांतून लगडली बोरे सात खंडी.
वळणावरचे झाड
थरकापू लागले, खट्टे मिट्ठे पेरू जागोजाग लोंबले.
ओलीचिंब झाली
हरभन्याची राने, पानांतले पोपट गाऊ लागले गाणे.
चिंचेचे हातपाय
काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे.
थंडी आली पेटवा आगटी शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार.
- शैला लोहिया
कवितेवर अधारित स्वाध्याय चाचणी सोडवा 👇
सुगी इयत्ता तिसरी मराठी कविता
Suresh Sude
2
Pari sachin kokare
ReplyDeletePari sachin kokare
DeletePost a Comment