दोस्त-इयत्ता तिसरी मराठी कविता स्वाध्याय

     


      दोस्त

माझी एक गाय होती, 

तिला होते वासरू,

 तोच माझा दोस्त होता, त्याला कसे विसरू ! 


मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ-पिऊ, 

दोघांसाठी एक पान्हा, आम्ही भाऊ-भाऊ..


दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उंडारला,

 की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला.


 आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने,

 गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने.


 हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लूस. 

त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचा खूश.


 कोवळ्या कोवळ्या जिभेने अंग माझे चाटायचा, ओठावरचा फेस त्याच्या साय मला वाटायचा.


 पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत,

 माझाही गुंतलेला जीव त्याच्या नाळेत. 


आज जेव्हा पाहतो मी भावा भावांचं फाटताना,

 आठवत राहतो दोस्त माझा अंग माझं चाटताना.


         • इंद्रजित भालेराव

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3153504779014806"

     crossorigin="anonymous"></script>

<ins class="adsbygoogle"

     style="display:block; text-align:center;"

     data-ad-layout="in-article"

     data-ad-format="fluid"

     data-ad-client="ca-pub-3153504779014806"

     data-ad-slot="2328094524"></ins>

<script>

     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

</script>

स्वाध्याय चाचणी सोडवा


1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post