जागतिक हात धुवा दिन
माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते.बहुतांश वेळेला माणूस आपल्या हाताने अन्नाचे सेवन करतो.अशावेळी, हात स्वच्छ नसतील तर माणूस स्वतःच अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. परिसरात, आजूबाजूला अनेक ठिकाणी असंख्य जिवाणू असतात. आपण विविध काम करत असताना ते आपल्याही नकळत हाताला चिटकलेले असतात. अन्न खाण्यापूर्वी आपण हात स्वच्छ धुतले नाही तर हेच जिवाणू आपल्या पोटात जातात. आपण आजारी पडतो.यावरून आपल्या लक्षात येते की हात धुणे ही मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
युनिसेफने विविध गरीब आणि विकसनशील देशात यावर काम करण्यास सुरुवात केली. 2008 साली स्वीडनमधील स्टोकहोम येथे पहिला 'जागतिक जल सप्ताह' आयोजित करण्यात आला होता. याच ठिकाणी संयुक्त राष्ट्र महासभेने 15 ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे ठरवले.2008 साली साजऱ्या झालेल्या या पहिल्या जागतिक हात धुवा दिनामध्ये जगभरातील 70 पेक्षा जास्त देश सहभागी झाले होते. सुमारे 200 दशलक्ष लोकांनी या दिवशी साबणाने हात धुतले.
हात केव्हा धुवावेत ?
1.खोकल्यावर अथवा शिंकल्यावर 2.स्वयंपाक करण्यापूर्वी व स्वयंपाक केल्यानंतर 3.जेवण्यापूर्वी आणि जेवल्यावर 4.आजारी व्यक्तीला भेटण्यापूर्वी 5.शौचालयाला जाऊन आल्यानंतर
हात कसे धुवावेत ? (हात स्वच्छ धुण्याच्या नऊ पायऱ्या)
1. आपले हात पाण्याने ओले करा. 2. आपल्या हातांना साबण लावा. 3. आपले तळवे एकत्र घासून घ्या. 4.आपले हात एकमेकांवर घासून घ्या. 5.आपले बोटे एकमेकांत (बेचक्यात) घालून घासा
6. आपले अंगठे घासून घ्या. 7. तळहातांवर बोटांची टोके घासा. 8. साबणाचा फेस पूर्ण निघून जाऊपर्यंत हात स्वच्छ धुवा.
9. स्वच्छ रुमाल किंवा टॉवेलचा वापर करून आपले हात स्वच्छ धुवा.
हात धुवा दिन आनंददायी गीत
जागतिक हात धुवा दिन - घोषवाक्ये
1. हात स्वच्छ धुवा, रोगराईला दूर ठेवा. 2. ज्याच्या घरी स्वच्छता, त्याच्या घरी आरोग्य, धनसंपदा
3. वेळोवेळी स्वच्छ धुवुया हात, कोरोनावर करूया मात
4.हात स्वच्छ धुण्याची सवय अंगिकारूया, आरोग्यसंपन्न भारताचे स्वप्न साकारूया. 5. घरात स्वच्छतेचे नियम पाळूया, कोरोनाला घराच्या बाहेर ठेवूया. 6.साबणाने हात धुवा, जीवनातून रोग मिटवा
Post a Comment