माहेर इयत्ता पाचवी मराठी कवितातापीकाठची चिकण माती,
कवितेवर अधारित स्वाध्याय चाचणी सोडवा
माहेर-या कवितेचे कवी सदाशिव माळी आहेत.या कवितेत कवीने माहेरवाशिणीच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.एखादी वस्तू बघून तिला कशाप्रकारे माहेरची आठवण येते हे रंजकतेने स्पष्ट केले आहे.
तापीकाठची चिकण माती,
ओटा तरी बांधू ग बाई,
असा ओटा चांगला तर,
जातं तरी मांडू ग बाई.
असं जातं चांगलं तर,
सोजी तरी दळू ग बाई.
अशी सोजी चांगली तर,
लाडू तरी बांधू ग बाई.
असे लाडू चांगले तर,
शेल्याच्या पदरी बांधू ग बाई.
असा शेला चांगला तर,
भाऊराया भेटू ग बाई,
असा भाऊ चांगला तर,
दारी रथ आणील ग बाई.
असा रथ चांगला तर,
नंदी तरी जुंपिन ग बाई,
असा नंदी चांगला तर,
माहेराला जाऊ ग बाई.
असं माहेर चांगलं तर,
धिंगामस्ती करू ग बाई!
– सदाशिव माळी
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3153504779014806"
crossorigin="anonymous"></script>
<ins class="adsbygoogle"
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-3153504779014806"
data-ad-slot="2328094524"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
Son kabali sri
ReplyDeleteBest test dear
DeletePost a Comment