रंग जादुचे इयत्ता मराठी कविता व्हिडीओ व स्वाध्याय चाचणी
रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनूचे असती
पांढर्यातुनि निघती साती पुन्हा पांढरे होती ॥
आकाशाला रंग निळा दया
छटा रुपेरी वरती असू दया
निळ्या अभाळी हिरवे राघू किती पाखरे उडती ॥
अवतीभवती काढा डोंगर
त्यावर तांबुस रंग काळसर
डोंगरातुनी खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती ॥
चार नेमक्या काढा रेषा
विटाविटांच्या भिंती सरशा
लहानमोठया चौकोनांची खिडक्या-दारे होती ॥
लाल लाल कौलारु छप्पर
अलगत ठेवा वरती नंतर
गारवेल जांभळया फुलांची डुलेल वार्यावरती ॥
सजले आता तुमचे घरकुल
पुढति त्याच्या पसरा हिरवळ
पाउलवाटांवरुन तांबडया सखेसोबती येती ॥
रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनूचे असती
आनंदाशी जुळवुन देतील सदैव तुमची नाती ॥
Post a Comment