आभाळमाया
ऐका. म्हणा. वाचा.
पावसा रे, पावसा रे, मला पावसाचे ढग बनू दे. डोंगर, दरी आणि शेतात, मला खूप कोसळू दे.
शेतकरीबाबा, शेतकरीबाबा मला बी म्हणून पेरून दे,शेत खूप पिकून पिकून,तुम्हांला बरकत होऊ दे.
पणती गं. पणती गं. मला दिवा होऊन जळू दे. गरिबांच्या झोपडीत, उजेड मला नेऊ दे.
पक्ष्या रे, पक्ष्या रे, मला चोच आणि पंख फुटू दे. तोंडात फळे घेऊन जाऊन,भुकेकंगालांना वाटू दे.
परी गं, परी गं, मला बागेत येऊ दे. आनंदाने नाचगाण्यासाठी, साऱ्यांना आभाळमाया मिळू दे
.- विलास सिंदगीकर
कवितेवर अधारित स्वाध्याय चाचणी सोडवा
Post a Comment