लातूर जिल्हा प्रेक्षणीय स्थळे(पर्यटन)

 लातूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी येथे क्लिक करा व पहा

                   👇


लातूर जिल्हा माहिती
लातूर जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले.. जिल्हा मुख्यालय लातूर हे "लट्टा" वा राष्ट्रकूट राजांचे मूळ निवासस्थान होते. राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष पहिला हा लट्टालूट नगरचा अधिपती "स्वामी" असल्याचे नमूद आहे व त्यानेच हे शहर निर्माण केले. इ.स. ७५३ मध्ये बदामीच्या चालुक्यानंतर आलेले राष्ट्रकुट राजे स्वतःला लट्टालूट पूर्वाशिष म्हणजे लट्टालूट निवासी असेच म्हणवून घेत. चालुक्य घराण्यातील "विक्रमादित्य" ६ व्या नन्तर त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा हा गादीवर आला. त्याने "अभिलाषीतीर्थ" हा ग्रंथ लिहिला, त्यामुळे त्याला "सर्वज्ञ चक्रवर्ती" असे म्हणत. लातूर जिल्ह्यात त्याचे राज्य असल्याचा व त्याच्या कारकिर्दीची नोंद असलेला कोरीव लेख सापडला आहे. त्यामध्ये लातूर येथील पापविनाशी देवीचे मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. सदर कोरीव लेख शके १०४९ (इ.स.११२९) मध्ये कोरल्याचा उल्लेख आहे. चालुक्यानंतर हा भाग देवगिरीच्या यादवाच्ंया अधिपत्याखाली आला
.इ.स. १३३७ मध्ये यादवांचे राज्य दिल्लीच्या सुलतानाच्या ताब्यात आले व दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा अंमल सुरू झाला. इ. स. १३५१ मध्ये दिल्लीच्या सुलतानाच्या साम्राज्यातील हा भाग बहामनी साम्राज्यात आला. बहामनी साम्राज्याची राजधानी गुलबर्गा होती.

      लातूर शहर ही या जिल्ह्याची राजधानी आहे. . १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतन्त्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात। आला. कालान्तराने उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन ऑगस्ट १६, १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला.
      तालुके १०

अहमदपूर
उदगीर
औसा
चाकूर
जळकोट
देवणी
निलंगा
रेणापूर
लातूर
शिरूर (अनंतपाळ)

    पर्यटन स्थळे
अष्टविनायक मंदिर, लातूर

 १९८९ मध्ये निर्मित हे नवीन मंदिर त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण तिथे देवालयाच्या दोन्ही बाजूंस उद्यान आहे, तसेच समोर काही कृत्रिम फवारे आहेत. उद्यानात ८ ते ९ फूट उंचीची शिवमूर्ती आहे.

उदगीरचा किल्ला, उदगीर :

१७६१ च्या मराठा व हैदराबादी निजामांमधील युद्धाचा साक्षी आहे. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वातील मराठा सेनेने निजामांचा पराभव केला व उदगीरचा सधी झाला.. उदगीरचा किल्ला ४० फूट खोल खंदकाने वेढलेला आहे, कारण किल्ला भूमी स्तरावर बांधला आहे. किल्ल्यात अरबी व फारशीत लिहिलेले काही दुर्मिळ कोरीव लेख आहेत.

औसा किल्ला, औसा :

हा किल्ला सर्व बाजूंनी उंच प्रांगणाने वेढलेला व खड्ड्यात आहे, ज्यामुळे व्यक्ती याच्या उंच स्थानावरून दूर अंततरावरून येणाऱ्या सेनेला पाहू शकतो. त्यावेळी जेव्हा किल्ल्याचा बहुतांश भाग लपलेला राहतो. जवळपास चौकोनी आकाराचा, किल्ला ३६.५८ मीटर रुंद खंदकाने किंवा चराने वेढलेला आहे. हा चर कोरडा आहे.



<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-3153504779014806"
     crossorigin="anonymous"></script>
<ins class="adsbygoogle"
     style="display:block; text-align:center;"
     data-ad-layout="in-article"
     data-ad-format="fluid"
     data-ad-client="ca-pub-3153504779014806"
     data-ad-slot="2328094524"></ins>
<script>
     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>

केशव बालाजी मंदिर, औसा : 

हे मंदिर औसाजवळ याकतपूर मार्गाजवळ आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर हे बांधले आहे. हे मंदिर व शेजारील क्षेत्र खासगी संपत्ती आहे पण भक्त दर्शनासाठी व पर्यटनासाठी तिथे जाऊ शकतो. किल्ल्यानंतर औसा नगरातील हे दुसरे आकर्षक स्थळ आहे. मंदिराजवळ निवासी सुविधा उपलब्ध आहे.

मंदिर उतारांनी वेढलेले आहे. गणेश, शिव, विठ्ठल, रुक्मिणी तसेच केशवानंद बापू यांना समर्पित चार वेगळी मंदिरे एकाच परिसरात आहेत. मंदिर सकाळी ६ला उघडून रात्री ९ला बंद होते. दिवसभरात विविध सेवा होतात. सकाळी १० व संध्याकाळी ७ वाजता अतिथींसाठी साधारण प्रसाद असतो. प्रत्येक शुक्रवारी महाप्रसाद सकाळी १० ते संध्याकाळी ६ दरम्यान असतो. हे मंदिर 'धर्म व संस्कार नगरी' प्रकल्पाचा भाग आहे.

खरोसा लेणी, निलंगा:

लातूरपासून ४५ किमी अंतरावर हे लेण्यांचे लहान गाव आहे. बुद्ध, नरसिंह, शिवपार्वती, कार्तिकेय व रावण यांचा लेण्यांतील शिल्पांत समावेश होतो. इतिहासकारांच्या अनुसार या लेणी ६ व्या शतकात गुप्त काळात बनल्या. लेण्यांजवळ रेणुका मंदिर व पिरपाशा दर्गा आहे.

नागनाथ मंदिर, वडवळ, चाकूर

बुद्ध उद्यान : मंदिरात विशाल बुद्धमूर्ती आहे.

लोहारा: उदगीर तालुक्यातील गाव महादेव बेट (टेकडी) व गैबीसाहेब बेटासाठी प्रसिद्ध आहे. निजामशाही वंशाच्या काळापासून बेनिनाथ मठ अस्तित्वात आहे.

वनस्पती बेट,

 वडवळ : ही टेकडी दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी व वनस्पतींचे माहेरघर आहे. हे ठिकाण लातूरपासून ३९ किमी व चाकूरपासून १६.५ किमी दूर आहे. टेकडी जमिनीपासून ६५० फूट (२०० मीटर) उंच व वडवळ गावापासून तीन किलोमीटर दूर आहे.

विराट हनुमान(लातूर):

ही परिवार गृह संस्था, औसा मार्ग, लातूर येथे आहे. देवालयाची रचना इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे. उत्तम उद्यानाने मंदिर आच्छादित आहे. मूर्ती २८ फूट उंच व शेदरी रंगाची आहे.

विलासराव देशमुख उद्यान, लातूर:

हे नाना नानी उद्यान होते. हे मध्यवर्ती ठिकाण महानगरपालिकेजवळ आहे व आरामदायक वातावरणामुळे जनतेत प्रसिद्ध आहे. नागरिक इथे सहपरिवार, अपत्यांसहित व मित्रांसह वेळ घालवतात. येथे एक मुक्त सभागृह आहे. उद्यानामध्ये सार्वजनिक बैठकांसाठी जागा आहे.

शिव मंदिर, निलंगा

साई धाम, तोंडार

साई नंदनवन, चाकूर: चाकूरजवळील आणखी एक पर्यटन स्थळ. ४०० एकर (१.६ चौ.किमी.) मध्ये पसरलेले आहे, इथे आंब्याचा मळा, जल उद्यान व मनोरंजन उद्यान आहे. उद्यानाच्या केंद्रात एक सत्यसाईबाबा मंदिर आहे.

सिद्धेश्वर मंदिर, लातूर : -

हे देऊळ मुख्य नगरापासून दोन किलोमीटरवर आहे. हे सम्राट 'ताम्रध्वजा'द्वारे निर्मित व सोलापूरच्या सिद्धरामेश्वर स्वामीला समर्पित आहे. हे लातूरचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी इथे १५ दिवसांची जत्रा असते.

सुरत शहावली दर्गा

हा राम गल्ली, पटेल चौकात आहे. हा लातूरचा भाग आहे. हा दर्गा १९३९ला मुस्लिम संत सैफ उल्लाह शाह सरदारींच्या स्मरणार्थ बांधला गेला. त्यांना येथे पुरले. येथे जून-जुलैमध्ये ५ दिवसांची जत्रा दरवर्षी असते.

हकानी बाबा, लातूर मार्ग, चाकूर

हत्ती बेट देवर्जन
: उदगीरजवळच्या या ठिकाणी एका लहान टेकडीवर संत गंगाराम यांची समाधी आहे. ह्या स्थानी काही कोरीव गुहा आहेत.. या स्थानाने ज्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात प्राणाहुती दिली अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांना जन्म दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post