प्रेरणादायी मराठी अनमोल विचार Motivational anmol marathi vichar

 



*प्रेरणादायी मराठी अनमोल विचार*


💎आयुष्यात जिंकाल तर असे जिंका

कि जणू जिंकण्याची सवयच आहे,

आणि हराल तर असे हरा कि जिंकून

कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.


💎सर्वात मोठे यश खूप वेळा

सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.


💎जेव्हा सगळंच संपून गेलंय

असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते

नवीन काहीतरी सुरु होण्याची.


💎कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यत अजून संपलेली नाही,

कारण मी अजून जिंकलेलो नाही


💎 समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे

अधिक भयानक असतात.


💎लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला

नमस्कार घालतात, मावळत्या नाही.


💎नेहमी लक्षात ठेवा

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.


💎ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,

जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,

कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,

आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.


💎जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,

कठोर जमिनीतून उगवू शकते

तर तुम्ही का नाही.



💎तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर

कधी गर्व करू नका कारण

बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा

एकाच डब्ब्यात ठेवले जातात.


💎काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर

वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.


💎 आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,

विचार बदला आयुष्य बदलेल.


💎 खेळ’ असो वा ‘आयुष्य’

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल..


 💎 हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा

स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ

आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.


💎 कितीही मोठा पाठिंबा असला तरी

यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच

जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.


💎 पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा

कारण जिंकलात तर,

स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…

आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.


💎 मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर

अपमान गिळायला शिका,

उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक

स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!


 💎 छत्री पावसाला थांबवू शकत नाही

पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,

तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री

देऊ शकत नाही पण

संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.


💎 स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,

स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.


💎 दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही

किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,

तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास

चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.


💎 खूप कमी लोक आपल्या आयुष्यात

सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,

पण खूप जास्त लोक आपल्याला कटू

अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.


💎 जितकी प्रसिद्धी मिळवाल

तितकेच शत्रू निर्माण कराल

कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी

जळणारे जास्त निर्माण होतील.


💎 भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,

रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.


💎 तलाव जेव्हा पाण्याने भरतो,

तेव्हा मासे किड्यांना खात असतात,

तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,

तेव्हा किडे मास्यांना खात असतात,

संधी सगळ्यांना भेटते मित्रानो

फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा


💎 वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत

घट्ट रुजून राहायचं असतं,

ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,

वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो

आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.


💎 एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा

एकमेकांशी बोला

तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.


💎 आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला

तीन पैकी एक कारण असतं

एक: त्यांना तुमची भीती वाटते

दोन: ते स्वतःचा व्देष करतात

तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.


💎 पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,

हातावर पडला तर चमकतो,

शिंपल्यात पडला तर मोती होतो ,

थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.


💎 एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते

पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,

म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका

कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण

करू शकत नाही.


💎 माणसाला स्वत:चा “photo”

का काढायला वेळ लागत नाही,

पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.


💎 जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल.


💎 कासवाच्या गतीने का होईना

पण रोज थोडी थोडी प्रगती करा,

खूप ससे येतील आडवे,

बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.


💎 माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं



💎 न हरता, न थकता न थाबंता

प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी

नशीब सुध्दा हरत.


💎 आयुष्यात कधीही कोणासमोर

स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका

कारण ज्यांना तुम्ही आवडता,

त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,

अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या

स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post