________________________
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचा पदाधिकारी सस्नेहमेळावा उत्साहात संपन्न
_______________________
लातूर-आज दि.१२/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस लातूर आयोजित *पदाधिकारी सस्नेहमेळावा व मानवविकास राज्यस्तरीय पुरस्कार २०२१ प्राप्त संघटनेच्या पदाधिका-यांचा सन्मान सोहळा* हाँटेल विश्वा लातूर येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष- *श्री.राजाभाऊ सोमवंशी*
【मराठवाडा अध्यक्ष शिक्षक काँग्रेस】
*प्रमुख पाहुणे*
*मा.श्री.भगवान फुलारी साहेब*
【शिक्षणाधिकारी प्रा.जि.प.लातूर】
*मा.श्री.विशाल दशवंत साहेब*
【उपशिक्षणाधिकारी प्रा.जि.प.लातूर】
मा.श्री राजेंद्र गिरी साहेब*
【डायट मुरुड अधिव्याख्याता】
*मा.श्री.संजय पंचगल्ले साहेब*
【गटशिक्षणाधिकारी पं.स.लातूर】
*मा.श्री.संतोष स्वामी साहेब*
【गटशिक्षणाधिकारी पं.स.निलंगा】
*मा.श्री.धनराज गित्ते साहेब*
【शिक्षणविस्तार अधिकारी पंस.लातूर】
*मा.श्री.निवृत्ती जाधव साहेब*
【शिक्षणविस्तार अधिकारी पंस.लातूर】
*मा.श्री.दिलीप पवार साहेब*
【शिक्षणविस्तार अधिकारी जि.प.लातूर】
*मा.श्री.भालचंद्र येडवे*
【पत्रकार प्रतिनिधी, लोकमत】
*मा.बालाजी कोळी साहेब*
【केंद्रप्रमुख - नांदगाव,बाभळगाव】
*मा.श्री.रमाकांत जाधव सर*
【चेअरमन,शिक्षक पतसंस्था लातूर तथा केंद्रप्रमुख महमदापूर】
मा.राजकुमार स्वामी
【राज्य नेते शिक्षक काँँग्रेस,लातूर】
*मा.श्री.केशवभैय्या गंभीरे सर*
【जिल्हाध्यक्ष शिक्षक काँग्रेस, लातूर】
*मा.श्री.सुरेश सुडे सर*
【जिल्हा सरचिटणीस शिक्षक काँग्रेस, लातूर】
वरील सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ माॕं साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली क्रार्यक्रमाचे प्रास्ताविकात शिक्षक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश सुडे सर यांनी संघटनेच्या शैक्षणिक, सामाजिक व शिक्षकांसाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. शिक्षक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष मा.कैशवभैय्या गंभीरे सर यांनी आपल्या मनोगतात संघटनेने आतापर्यंत केलेल्या कार्याचा माहिती देऊन लातूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षक काँग्रेस सदैव शिक्षकांसोबत असल्याचे सांगून जिथे प्रश्न गंभीर तिथे शिक्षक काँग्रेस खंबीरपणे शिक्षकांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास शिक्षकांना दिला.व भविष्यात शिक्षक काँग्रेस संघटनेची बांधणी व ध्येयधोरणे याबाबतीत माहिती दिली. तसेच मा शिक्षणाधिकारी साहेबांना 12 व 24 वर्षे वरिष्ठ वेतनश्रेणी व चट्टोपाध्याय त्रुटी पुर्तता झालेली शिक्षकांची यादी लवकरात लवकर काढावी.व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख रिक्त पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्याची मागणी केली. मा.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका व संघटनेच्या पदाधिकारी...
*संगिता पवार मॕडम*
व ज्या शिक्षक काँग्रेस पदाधिकारी यांना *मानवविकास राज्यस्तरीय पुरस्कार 2021प्राप्त -श्री.बालाजी सर्जे, श्री.प्रकाश जाधव,श्रीमती माधुरी वलसे,श्रीमती मंदाकिनी भालके, श्रीमती वर्षा शिंदे,श्रीमती उमा हेंगणे,श्रीमती कृष्णलता चामले,श्रीमती शामल कुलकर्णी* यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पहार पुस्तक व वृक्ष भेट देऊन करण्यात आला.मा.शिक्षणाधिकारी भगवान फुलारी साहेबांनी आपल्या मनोगतात शिक्षक काँग्रेस संघटना ही शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण वाडी वस्तीवर देणा-या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य उल्लेखनीय करत असून यामुळे लातूर जिल्ह्यातील गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मदत होते असे सांगितले. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी व चट्टोपाध्याय यादी पुढील आठवड्यात नक्कीच काढु असे आश्वासन याप्रसंगी संघटनेस दिले व मुख्याध्यापक व केद्रप्रखुम पदोन्नती पण लवकरच करण्यात येईल असे आश्वासन दिले व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
उपशिक्षणाधिकारी जि.प.लातूर मा.विशाल दशवंत साहेबांनी शिक्षक काँग्रेस संघटनेच्या शैक्षणिक, सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
लातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.संजय पंचगल्ले साहेबांनी लातूर तालुक्यातील शिक्षकांचे कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगून बाला उपक्रमात अनेक शाळा चांगले कार्य करीत असून आणखीन जास्तीत जास्त कार्य करुन लातूरचा नवीन शैक्षणिक पँटर्न तयार करावा असे आवाहन केले. पंचायत समिती निलंगा गटशिक्षणाधिकारी संतोष स्वामी साहेब व लोकमतचे पत्रकार भालचंद्र येडवे यांनी पण संघटनेच्या कार्यास व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस संघटनेत कार्य करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अनेक शिक्षक बंधू-भगिनींनी प्रवेश केला.संघटनेच्या वतीने त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले...
पुरस्कार प्राप्त शिक्षिका मंदाकिनी भालके मँडम व माधुरी वलसे मँडम यांनी मनोगतातून विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करणार असून महिलांनी ही संघटनेत सामील होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचचे बहरदार सुत्रसंचालन महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती संगीता पवार मँडम व ह.भ.प.श्री.काळे महाराज यांनी केले.आभार जिल्हा उपाध्यक्ष उत्तम शेळके सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष संजय बिरादार सर,जिल्हा नेते प्रदीप ढेंकरे सर,जिल्हा उपाध्यक्ष अमोल राठोडे सर,जिल्हा संपर्कप्रमुख प्रताप सोमवंशी सर ,जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम जाधव सर,औसा तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार सर,कार्यालयीन सचिव काकासाहेब ठोके सर,उपाध्यक्ष चंद्रकांत तोळमारे सर,लातूर तालुकाध्यक्ष दत्तात्रय चिवडे सर,सचिव नरसिंग फेसाटे सर,तालुका सरचिटणीस शि.अनंतपाळ गोपाळ कोतागडे सर,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अनिता पिनाटे,आदिमाया वाघमारे,लोहार संतोषीमाता,औसा कार्याध्यक्ष सावित्री बिरादार,उपाध्यक्ष जयश्री मुदाळे,उपाध्यक्ष भिमाबाई म्हेत्रे इत्यादीनी प्रयत्न केले व यावेळी अनेक तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
््
Very nice
ReplyDeletePost a Comment