रानपाखरा
रानपाखरा, रोज सकाळी येसी माझ्या घरा,
गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा.
शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी,
सतेज डोळे चमचम करती जणु रत्ने गोजिरी.
व्हिडीओ पहा
👇
पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला,
अफाट आभाळातुन कैसे उडता येते तुला ?
रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर,
तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर..
तुझ्यासारखे जावे बाटे उडत मजेने वरी
नेशिल का मज तुझ्या बिन्हऱ्हाडी बसवुनि पंखांवरी ?
माय तुझी येईल, सूर्य ही येइल भेटायला,
मजाच होइल संख्या पाखरा, नेइ एकदा मला.
स्वाध्याय चाचणी सोडवा
Post a Comment