आपण बोललेले आपोआप कसे टाईप होते पहा.-Voice Typing

*चला तंत्रस्नेही होऊया* 
  आपण फक्त बोला आपोआप बोललेले टाईप कसे होते पहा. 
       मित्रांनो आपण मोबाईल वापर मोठ्या प्रमाणात करतो.अनेकदा आपण सोशल मिडियाचा वापर करताना आपणास आपले मत व्यक्त करताना,किंवा आपणास एख्याद्याला कांही माहिती पाठवायची आहे.त्या माहितीची एखादी छान पोष्ट तयार करुन पाठवायची आहे. मग ते टाईप करण्यात आपला बराचसा वेळ जातो.टाईप करण्याचा कंटाळा येतो.हेच आपण जर बोललो आणि ते आपोआप टाईप झाले तर कसे होईल ? आपला वेळ पण वाचेल.आणि आपले काम पण सोपे होईल.आपला टाईप करण्यासाठी लागणारे श्रम पण कमी होतील. चला तर मग आजच्या पोष्ट मध्ये आपण आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर मधून एक अँप घ्यायची आहे.त्या अँपचे नाव आहे Google Indic App ही अँप आपल्या मोबाइल मध्ये की-पँडचे काम करते.वापरण्यासाठी पण सोपेच आहे.यामध्ये आपणास आपण बोललेले कोणत्याही भाषेमध्ये आपोआप टाईपकरता येऊ शकते. यावर माझा Youtube ला व्हिडीओ पण पाहू शकता.त्याची लिंक येथे दिलेली आहे. 
                   👇
 

           

प्रथम आपण play store मधून Google indic app डाऊनलोड करून घ्यायची आहे आता ती ओपन करा. 
◆आपल्या समोर की पँड ओपन होईल. ◆मोबाईलच्या उजव्या बाजूला माईकचे चिन्ह दिसेल.
 ◆माईकवर क्लिक करा व आपणास जे टाईप करायचे आहे ते फक्त बोला आपोआप टाईप होईल. ◆त्याच ठिकाणी आपणास भाषा बदलायची असेत सेटींग च्या चिन्हावर क्लिक करुन बदलू शकता. ◆यामध्ये आपण मराठी ,इंग्रजी, हिदी अशा अनेक भाषा वापरु शकतो. 
         चला तर मग मित्रांनो आपण आपल्या मोबाईमध्ये या अँपच्या माध्यमातून आपण आपले काम सोपे करु शकता. आपणास ही माहिती नक्कीच आवडेल. या पोष्ट मुळे कोणत्याही अँपची प्रसिद्धी किंवा जाहिरात नाही. आपणास आपले काम सोपे जावे हीच अपेक्षा आहे.आपला वेळ वाचावा व आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आपली प्रगती करावी हाच उद्देश.आपण जर पुस्तक किंवा लेख लिहीत असात तर मग आपणास ही ट्रीक खुपच उपयोगाची आहे.आणखीन पण माझ्या ब्लागच्या माध्यमातून आपणास तंत्रज्ञानावर अधारित अशीच माहिती मिळतच राहील.
- आपलाच सुरेश सुडे

4 Comments

Post a Comment

Previous Post Next Post