*राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021*
*NAS ( National achievement survey)*
◆सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
१)इयत्ता तिसरी - CLICK HERE
२)इयत्ता पाचवी -CLICK HERE
३)इयत्ता आठवी - CLICK HERE
४)इयत्ता दहावी
◆गणित मराठी - click here
◆सामाजिकशास्त्र इंग्रजी- click here
◆सामाजिक शास्त्र विज्ञान- Click here
NAS माहिती
◆भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) दिल्ली, CBSE बोर्ड व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने संपूर्ण राज्यात एकाच दिवशी राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी घेण्यात येणार आहे.*
◆उद्देश -राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्याची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तराची माहिती घेणे कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तर किती प्रमाणात कमी जास्त आहे हे ठरविणे*
◆दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी देशभरात प्रत्येक जिल्ह्यातील इ. 3 री आणि 5 वी च्या प्रत्येकी 61 वर्गांवर व 8 वी च्या 51 वर्गांवर हे सर्वेक्षण होणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील एकूण 173 वर्गांवर हे सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणाला राष्ट्रीय संपादणूक चाचणी असेही म्हटले जाते.*
◆शाळा निवडताना NCERT कडून s, r1 आणि r2 या प्रकारात शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.*
◆(selected), r1 (reserve 1) आणि r2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार ह्या सर्वेक्षणासाठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी स्वतः Random पद्धतीने निवडलेले असतील.*
◆निवडलेल्या शाळांची यादी व निवडलेले वर्ग NAS SCERT पुणे कडून जिल्हा निहाय याद्या चाचणी पूर्व दोन ते तीन दिवस अगोदर दिल्या जातील.*
◆या सर्वेक्षणाअंतर्गत निवडलेल्या शाळेतील निवडलेल्या वर्गामध्ये दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी चाचणी होणार आहे.*
◆चाचणी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत सर्व्हेक्षणमध्ये निवडण्यात आलेल्या शाळेमध्येच घेण्यात येणार आहे.*
◆परिस्थितीनुसार तारखेत व वेळेत बदल होऊ शकतो*
◆चाचणीचे स्वरूप:- objective/MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.*
◆इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे (वेळ 60 मिनीट)*
◆ इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)*
◆चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय अभ्यासक्रमातील क्षमतावर आधारित असणार आहेत*
◆ या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर DMU (District Monitoring Unit) स्थापन केले आहे. यामध्ये DIECPD प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश असेल.*
◆चाचणीच्या दिवशी हे DMU भरारी पथक म्हणून जिल्हास्तरावर काम करेल, जिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे.*
◆चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. यांच्या मार्फतच संबधित वर्गाची चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे.*
◆प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी चाचणी च्या एक दिवस अगोदर जिल्हा/तालुका स्तरावरून सीलबंद स्थितीमध्येच ताब्यात घ्यायच्या आहेत.*
◆आपल्याला मिळालेल्या सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका या पर्यवेक्षकासमोरच बाहेर काढायच्या आहेत व त्यावर पर्यवेक्षकाची व दोन साक्षीदार विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे.*
◆ निवडलेल्या वर्गाची पटसंख्या 30 किंवा 30 पेक्षा कमी असेल तर संपूर्ण 100% विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे आणि जर वर्गाची पटसंख्या 30 पेक्षा जास्त असेल तर फक्त 30 च विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे*
◆विद्यार्थ्यांना हजर ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी शाळेची राहिल.*
◆ चाचणी सोडवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे चाचणीच्या दिवशी निळा/काळा बोलपेन असावा असे नियोजन शाळेने करावयाचे आहे.*
◆निवडलेल्या वर्गांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्र. शाळेने आपल्या दप्तरी ठेवावे व चाचणी दिवशी आलेल्या पर्यवेक्षकाकडे द्यावेत*
◆उत्तरपत्रिकांचे हे सीलबंद लिफाफे राज्यस्तरावर जाणार आहेत.*
◆या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावर OMR पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुकानिहाय निकाल वेबसाइटवर NAS च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.*
◆ यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल, राज्यातील/जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे-पुढे आहे हे समजेल*
◆ आलेल्या निकालावरून NCERT, SCERT आणि DIECPD यांचेकडून कृतीकार्यक्रम तयार केला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी संबधित तालुक्यांना करावयाची आहे*
◆ *पर्यवेक्षण कोण करणार?*
◆SCERT/ DIECPD व जि.प. यांच्याकडून आपल्या वर्गासाठी पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आपणांस त्याला फक्त सहकार्य करायचे आहे. वर्गाचे पर्यवेक्षण पर्यवेक्षक करतील तर तालुक्यावर काही खास अधिकारी निरीक्षक म्हणून असतील, त्यांचे एक भरारी पथक असेल.*
◆*उत्तरपत्रिका कोण तपासणार?*
◆प्रत्येक उत्तरपत्रिका OMR पद्धतीने तपासली जाणार आहे. यासाठी राज्यावर स्वतंत्र यंत्रणा असणार आहे. पर्यवेक्षक चाचणी संपल्यावर पर्यवेक्षक सर्व उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका सीलबंद पॅकेट मध्ये घालून पुढील यंत्रनेकडे पाठवतील*
◆चाचणीचा निकाल प्रत्येक राज्यातील जिल्हानिहाय अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल*
◆वरील माहिती ही राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण संदर्भात निर्गमित झालेल्या परिपत्रकांच्या आधारे संकलित केलेली आहे या माहितीमध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात*
10 वी प्रश्नसंचाची लिंक दिसत नाही
ReplyDeleteखाली गणित मराठी सामाजिक शास्त्र, इंग्रजी, विज्ञान दिली आहे
ReplyDeletePost a Comment