लातूर जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार CMP प्रणाली द्वारे

 

★_______________________★

*लातूर जिल्ह्यातील शिक्षकांचा माहे आँक्टोबरचा पगार CMP प्रणीलीद्वारे-मा.अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे*

लातूर जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय



◆_______________________◆

💥 *शिक्षक काँग्रेसच्या प्रयत्नाला यश*

*जिथे प्रश्न गंभीर*

    *तिथे शिक्षक काँग्रेस खंबीर*

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

लातूर- लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे प्रत्येक महिन्याच्या पगारी वेळेवर होत नसल्याने *महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस लातूर जिल्हा शाखेच्या* वतीने सर्वप्रथम *मा.अध्यक्ष महोदय जि.प.लातूर,मा.उपाध्यक्षा महोदय जि.प.लातूर, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब,मा.लेखा व वित्त अधिकारी साहेब, मा.शिक्षणाधिकारी ( प्राथ. ) साहेब* यांना दि.15.9.2020 ला निवेदन दिले होते.व सतत पाठपुरावाही केला.त्यानंतर मा.अध्यक्ष महोदय यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना दि.16-9-2020 ला पत्र पाठवून CMP प्रणालीद्वारे शिक्षकांचे पगार करण्यासाठी आदेशित केले होते.लातूर जि.प.अधिकारी यांची टीम जालना जि.प.ला भेट देऊन CMP प्रणालीचा अभ्यास करून लातूर जि.प.मध्ये सुद्धा ही प्रणाली सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करुन लातूर जिल्ह्यातील शिक्षकांचा माहे आँक्टोबर महिन्याचा पगार हा महाराष्ट्र  प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या पाठपुराव्याने CMP प्रणालीद्वारेच करणार असल्याचे *मा.राहुलभैय्या केंद्रे साहेब* यांनी  सांगितले. व तो शब्द पुर्ण करुन दाखविला त्या बद्दल लातूर जिल्हा शाखेच्या वतीने लातूर जि.प.मा.अध्यक्ष *राहुलभैय्या केंद्रे साहेब,* मुख्य लेखा व वित्त अधिकारी  *रत्नराज जवळगेकर साहेब*,व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी *भगवान फुलारी साहेब* यांचा शिक्षकासांठी जिव्हाळ्याचा विषय सोडवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या प्रश्नासाठी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष *केशवभैय्या गंभीरे सर*,जिल्हा सरचिटणीस *सुरेश सुडे सर*,जिल्हा कार्याध्यक्ष *संजय बिरादार*, जिल्हा कोषाध्यक्ष *बालाजी सर्जे सर*,जिल्हा नेते *प्रदीपकुमार ढेंकरे सर, सत्यवान शिंदे सर*, मुअ.संघटना अध्यक्ष *विकास माने सर*,जिल्हा संपर्कप्रमुख *प्रताप सोमवंशी सर*,जिल्हा उपाध्यक्ष *अमोल राठोडे सर,उत्तम शेळके सर,बिराजदार सर,जाधव आत्माराम, सिरुरे सुजित,पाटील सत्यजित, डाके गणेश,गायकवाड हानमंत सर* व सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले....

जळकोट तालुक्याचा माहे सप्टेंबर चा पगार Ncp प्रणीलीने करण्यात आला. आणि आता माहे आँक्टोबर चे वेतन लातूर जिल्ह्यातील शिक्षकांचे Cmp प्रणालीमध्ये होणार.



2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post